अवयवदानासंदर्भात समाज बदलतोय - सुनील देशपांडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नागपूर - अवयवदानाविषयी समाजाची मानसिकता संथगतीने का होईना बदलत आहे. १० लाखांमध्ये ८ टक्‍क्‍यांवरील अवयवदानाचे प्रमाण अलीकडे २२ टक्के झाले आहे, अशी माहिती सुनील देशपांडे यांनी दिली. 

अवयवदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी नाशिक ते आनंदवन असा १,१०० किलोमीटरचा पायी प्रवास करण्यात येत असल्याचे देशपांडे म्हणाले. ते म्हणाले, अमेरिकेत प्रति दहा लाख व्यक्तींमध्ये अवयवदानाचे २७ टक्के तर स्पेनमध्ये ३४ टक्के प्रमाण आहे. 

देशाच्या सीमेवर असताना काही शाळांतील मुले अवयवदानाचे फॉर्म घेऊन आल्यानंतर ही प्रेरणा मिळाली. १०५ फॉर्म भरून दिल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

प्रवासादरम्यान एका गावात प्रत्येक दोन घराआड एक जण सैन्यात असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले. एका १८ वर्षीय मुलाने जन्मदिनानिमित्त अवयवदानाचा अर्ज भरला. त्यासोबतच ८ जणांनी भरला. यामुळे आगामी काळात देहदानाची संकल्पना समाजात नक्की रुजेल, असा आत्मविश्‍वास निर्माण झाला. 

१४ जानेवारीला आनंदवन येथे पोहोचणार असल्याचे ते म्हणाले. प्रियदर्शन बापट, शरद दाऊतखानी, रंजना देशपांडे, डॉ. रवी वानखेडे उपस्थित होते.

बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा 
अवयवदानासंदर्भात बाबा आमटे यांनी रचलेल्या कवितेतून प्रेरणा मिळाली. ही चर्चा रोटरी क्‍लब सदस्यांशी केली. यानंतर जनजागृतीसाठी पायी प्रवास सुरू केला असल्याचे देशपांडे म्हणाले. नाशिकपासून अवयवदान जागृतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे ८० कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक ठिकाणी रोटरीकडून मदत मिळाली, असेही ते म्हणाले.

Web Title: society change about body part donate