नागपूर, उल्हासनगर, अमरावतीला "जीएसटी'चे अनुदान वाढले

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

राज्यातील 26 महापालिकांना 1404 कोटी 9 लाखांचे अनुदान मंजूर कोटी

सोलापूर: महाराष्ट्र वस्तू व सेवा कर योजनेच्या मोबदल्यात (जीएसटी) जुलैच्या तुलनेत नागपूर, उल्हासनगर व अमरावतीच्या अनुदानात वाढ झाली आहे. राज्यातील 26 महापालिकांना तब्बल 1404 कोटी 09 लाख रुपये मंजूर झाले आहेत. गत महिन्यात ही रक्कम 1385 कोटी 27 लाख रुपये होती. "जीएसटी'लागू झाल्यावर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अनुदान देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी दुसऱ्या महिन्यातही वेळेवर झाली आहे. बुधवारी त्याचा आदेश काढण्यात आला.

जुलै महिन्याच्या तुलनेत नागपूर, अमरावती व उल्हासनगरच्या अनुदानात वाढ झाली आहे. जुलैमध्ये नागपूरला 42 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते, ते ऑगस्टमध्ये 60 कोटी 28 लाख रुपये मिळणार आहे. त्यांच्या अनुदानात 17 कोटी 84 लाखांची वाढ झाली आहे. उल्हासनगरच्या अनुदानात 98 लाखांची वाढ होऊन 13 कोटी 83 लाख, तर अमरवतीच्या अनुदानात एक लाखाने वाढ होऊन 7 कोटी 83 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 1 जुलैपासून देशात वस्तु व सेवा कराची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे यापूर्वी वसूल करण्यात येणारा प्रवेशकर, स्थानिक संस्था कर, जकात, उपकर किंवा इतर सर्व कर बंद करण्यात आले आहेत. त्यापोटी हे अनुदान दिले जाणार आहे.

महापालिकांना मंजूर झालेले अनुदान (रक्कम कोटी रुपयांत)
बृहन्मुंबई (647.34), मीरा-भाईंदर (19.51), जळगाव (8.74), नांदेड-वाघेळा (5.68), वसई-विरार (27.06), सोलापूर (18.60), कोल्हापूर (10.35), औरंगाबाद (20.30), नगर (7.12), उल्हासनगर (13.83), अमरावती (7.83), कल्याण-डोंबिवली (19.92), चंद्रपूर (4.49), परभणी (1.54), लातूर (1.25), पुणे (137.30), पिंपरी-चिंचवड (128.97), नागपूर (60.28), ठाणे (59.30), नवी मुंबई (77.92), सांगली-मिरज-कुपवाड (10.95), भिवंडी-निजामपूर (18.10), मालेगाव (11.68), नासिक (73.40), धुळे (7.34), अकोला (5.29) (एकूण ः 1404.09).

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: solapur news nagpur ulhasnagar amravati gst