म्हणे, शाळा विकली; वर्ग उघड्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 डिसेंबर 2019

आठ दिवसांपासून विद्यार्थिनींसह शिक्षक शाळेबाहेर बसून त्रस्त झाले आहेत. ही बाब शुक्रवारी पालकांना कळल्यावर त्यांनी शाळेला भेट दिल्यावर समोर आली आहे. या घटनेने संतापलेल्या पालकांनी शाळेची तक्रार केली आहे. सोबतच मुलींना इतरत्र किंवा दुसऱ्या शाळेत शिक्षणासाठी पाठविणार नसल्याचा निर्धार केला आहे.

कामठी (जि. नागपूर) : मागील पन्नास वर्षांपासून स्त्री शिक्षणात अग्रेसर भूमिका निभविणारी कामठीच्या कॅंटोन्टमेंट परिसरातील स्कूल ऑफ होमसायन्स ही मुलीची शाळा व्यवस्थापनाने विकल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रामकृष्ण मठ मिशनने इमारतीवर मालकी कायम ठेवत विद्यार्थी व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हस्तांतरण केले आहे. यामुळे या शाळेतील विद्यार्थिनीचे वर्ग आठ दिवसांपासून प्रांगणातील शेडमध्ये भरत आहेत. 

आठ दिवसांपासून विद्यार्थिनींसह शिक्षक शाळेबाहेर बसून त्रस्त झाले आहेत. ही बाब शुक्रवारी पालकांना कळल्यावर त्यांनी शाळेला भेट दिल्यावर समोर आली आहे. या घटनेने संतापलेल्या पालकांनी शाळेची तक्रार केली आहे. सोबतच मुलींना इतरत्र किंवा दुसऱ्या शाळेत शिक्षणासाठी पाठविणार नसल्याचा निर्धार केला आहे. सध्या या शाळेत हिंदी माध्यमाचे पाचवी ते दहावीपर्यंतचे सुमारे पाचशे विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शाळा संचालित करणारी संस्था रामकृष्ण मठ मिशनने 2017 मध्ये स्कूल ऑफ होमसायन्स या शाळेचे अनुदानित पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे यवतमाळ येथील बुद्धिराव नागोराव खैरे शिक्षण संस्थेला परस्पर हस्तांतरित करण्यात आले. 

हेही वाचा - पहिल्या तडफदार भाषणाने जिंकले मन, सदस्य म्हणाले त्यांना बोलू द्या

शनिवारी रामकृष्ण मठ मिशन संस्थेने दुपारी 12 वाजता स्कूल ऑफ होमसायन्सच्या अनुदानित वर्गातील 426 विद्यार्थिनी व 21 शिक्षकांना शाळेच्या इमारतीत प्रवेश दिला नाही. यामुळे दिवसभर विद्यार्थी शाळेच्या क्रीडांगणावर ताटकळत बसले होते. या घटनेची माहिती काही विद्यार्थिनींनी पालकांना दिल्यावर ते शाळेत आले. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. याबाबत पालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात व शिक्षक आमदार नागो गाणार यांच्याकडे तक्रार करून याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

Image may contain: sky, tree, outdoor and nature

गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही ठेवले अंधारात

पालकांनी आठ दिवसांपासून शाळेत हा प्रकार सुरू असून, आमच्या मुलींना शाळेच्या प्रांगणात व्यवस्थापनाकडून बसवण्यात असल्याची तक्रार गटशिक्षणाधिकारी कश्‍यप सावरकर यांच्याकडे केली. त्यांनी लगेच शाळेत भेट देऊन पाहणी केली व शाळा व्यवस्थापनाला हा असा प्रकार करता येत नसल्याचे सांगितले. यावेळी शाळा हस्तांतरित केल्याबाबतची कोणतीही माहिती त्यांना शाळा व्यवस्थापनाकडून दिली नसल्याचेही समोर आले. 

क्लिक करा - चोर आला, चोर आला अन्‌ गेला जीव

पालक म्हणतात, दुसऱ्या शाळेत पाठविणार नाही

स्कूल ऑफ होमसायन्स शाळेला मुलीच्या शिक्षणाची चांगली परंपरा असल्याने येथे प्रवेश दिला आहे. येथे उत्तम शिक्षण दिले जाते. आम्ही व्यवस्थापनांने शाळा हस्तांतरणाचा केलेल्या कृतीचा तीव्र निषेध करतो, आम्ही आमच्या मुलींना याच शाळेत शिकवणार इतर दुसऱ्या ठिकाणी शाळा हस्तांतरण झाल्यास त्या शाळेत आम्ही शिक्षणासाठी पाठवणार नाहीत, असे पालकांनी ठासून सांगितले. 

सविस्तर वाचा - कमालंच की, मटणानंतर आता बोकडाच्या चामड्यासाठी आंदोलन

डॉ. अडवाणींचे स्वप्न राहणार का अधुरे

कामठी येथील राष्ट्रपती पुरस्कार मिळविणारे डॉ. बी. टी. अडवाणी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह 1962 साली रामकृष्ण शारदा मिशन संस्थेची स्थापना करून कामठी कॅंटोन्टमेंट परिसरात "स्कूल आफ होमसायन्स' शाळा सुरू केली होती. उत्तम विद्यार्थिनी घडविण्याचा मानस घेऊन डॉ. अडवाणी यांनी सुरू केलेल्या शाळेच्या निर्मितीसाठी कामठी शहरातून लोकवर्गणी करण्यात आली होती. 2011 साली डॉ. अडवाणी यांच्या निधनानंतर रामकृष्ण मठ मिशन या संस्थेकडे शाळा हस्तांतरित करण्यात आली. 

अनुदानित शाळा चालविण्यात नाही स्वारस्य

रामकृष्ण शारदा मिशन यांच्याकडे शाळा हस्तांतरित झाल्यानंतर शासकीय अनुदानित शाळा चालविण्यास मिशनला काहीही स्वारस्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ही शाळा विकण्याचा घाट घातला व 2017 मध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा याच परिसरात सुरू केली. तेव्हापासून गरीब परिवारातील शिकणाऱ्या मुलींची शाळा बंद करण्यासाठी मिशन प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी ही शाळा यवतमाळ येथील बुद्धिस्ट नामदेवराव खैरे मल्टिपर्पज सोसायटीला हस्तांतरित करण्यात आली. 

जाणून घ्या - 'ती' गावात आली अन्‌ होत्याचे नव्हते झाले

गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या
दोन्ही संस्थेने मुलांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. याकडे सरकारने लक्ष देणे आवश्‍यक आहे. दोषींवर कारवाई करावी. 
- सुनील पाटील, 
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sold by the school management in Nagpur