खामगव न्यायालयाच्या नवीन ईमारतीचा प्रश्न मार्गी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

खामगाव : येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. जि. प. च्या बांधकाम विभागाच्या कार्यालय असलेली न्यायलयाची जागा आज न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे.

खामगाव : येथील 111 वर्ष जुन्या न्यायालयीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. जि. प. च्या बांधकाम विभागाच्या कार्यालय असलेली न्यायलयाची जागा आज न्यायालयाच्या ताब्यात दिली आहे.

खामगांव जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची इमारत ही 111 वर्ष जूनी असून जीर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी वार्यामुळे न्यायालयाच्या काही भागाचे टिन उडाले होते. तसेच खटलयांची व न्यायालयाची संख्या सुद्धा वाळलेली असल्याने नवीन इमारतीची अत्यंत गरज असल्याने येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यवंशी साहेब यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सुद्धा त्यास साकारात्मक प्रतिसाद देत तहसील कार्यालयाच्या ताब्यात असलेली इमारत खाली करून घेतली. त्यानंतर शासनाचा 30 हजार चौरस फुटाचा प्लॉट सुद्धा न्यायालयाच्या नवीन इमारतीकरिता हस्तांतरित करण्यात आलेला आहे.

नवीन इमारतीच्या प्रस्तावाकरिता खुप वर्षांपासून जि. प. च्या बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली इमारतीमुळे आडकाठी येत होती. आज दि. 27 जून रोजी जि. प. चे अभियंता परदेसी यांनी सदर इमारतीचा ताबा न्यायाधीश सूर्यवंशी साहेब यांच्याकडे दिला. यावेळी आ. आकाशदादा फुंडकर, न्या. पथाडे साहेब, न्या. चव्हाण साहेब, न्या. म्हस्के साहेब, न्या. भोसले साहेब, न्या. अग्रवाल साहेब, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. आळशी, सचिव ऍड. जयंत पाटिल, ऍड. आपटे, ऍड. बोदडे, ऍड. आरिफ शेख, ऍड. राजा, न्यायालयीन कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. सदर जागेचा ताबा मिळाल्यामुळे नवीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अजय आळशी यांनी दिली आहे.

प्रस्ताव प्राप्त होताच निधी उपलब्ध करून देवू:- आ. फुंडकर
खामगांवच्या न्यायालयाची इमारत जूनी असून अपुरी पड़त आहे. न्या. सूर्यवंशी साहेब नवीन इमारतसाठी सतत प्रयत्नशील आहे. नवीन इमारतकरिता सरकार सकारात्मक असून न्यायालयाकडून प्रस्ताव प्राप्त होताच नवीन अद्यावत इमारतीकरिता आवश्यक तेवढा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती आ. आकाश फुंडकर यांनी दिली आहे.

Web Title: solve the problem of new building of khamgao court