दुष्काळात अकोला सावत्र, सरासरी पैसेवारी ५० पेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

अकोला : राज्यातील दुष्काळ घोषित केलेले १५१ तालुके, तसेच इतर तालुक्यामधील २६८ महसुली मंडळा व्यतिरिक्त ९३१ गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मात्र, अकोला जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैसांपेक्षा कमी असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट आणि पातूर तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश करण्यात आला नसल्याने दुष्काळाबाबत राज्य शासनाकडून अकोल्याला सावत्र वागणूक मिळत असल्याचे दिसून येते.

कमी पर्जन्यमान, पिकांची स्थिती वाईट आणि अनेक भागात पाणीटंचाई असल्याने राज्यातील १५१ तालुक्यामध्ये दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. याशिवाय ज्या महसूल मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यापेक्षा कमी पाऊस झाला अशा २६८ महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित करून सवलती लागू करण्यात आल्यात. यात अकोला जिल्ह्यातील अकोट आणि पातूर वगळता अकाेला, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्यांचा समावेश होता. अकोटमधील एकाच महसूल मंडळाचा समावेश दुष्काळी मंडळाच्या यादीत करण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर राज्यातील ९३१ गावांमध्येही राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. यावेळीही अकोला जिल्ह्याला राज्य शासनाकडून सावत्र वागणूक मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील अकोट आणि पातूर तालुक्यातील एकाही गावाचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आला नाही.

पाठपुरावा पडला कमी
जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. उर्वरित दोन तालुक्यातही दुष्काळी परिस्थिती असताना दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. महसूल मंडळाच्या यादीतही एकाच मंडळाचा समावेश झाला. त्यानंतर गावांची यादी जाहीर केली. त्यातही जिल्ह्यातील एकाही गावाचा समावेश झाला नाही. दुष्काळी परिस्थितीची जाणीव राज्य सरकारला करून देण्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा कमी पडल्यानेच हे दोन्ही तालुके वंचित राहिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: some villages face drought in akola