जमिनीच्या वादातून आईलाच फेकले ट्रॅक्टर खाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

वाशिम : जिल्ह्यातील मुंगळा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेताच्या वादातून एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली फेकल्याची घटना घडली आहे.

शेतीच्या वादातून शेजारी लागूनच असलेल्या शेतमालकाने त्यांच्या शेतात ट्रॅक्टर घातला, त्यामुळे आधी आईच्या अंगावरून ट्रॅक्टर घाला व त्यानंतर आमच्या सर्वांच्या अंगावरून ट्रॅक्टर घाला, असे म्हणत मुलानेच आईला ट्रॅक्टरखाली ढकलून दिले.

या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मुलगा आपल्या जन्मदात्या आईला कशापद्धतीने ट्रॅक्टरखाली फेकतो आहे, याचे दृष्यही या व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. निर्दयीपणे हा मुलगा आपल्या आईला मारहाण करत ट्रॅक्टरखाली ढकलतो आहे. इतर लोक तिला वाचवायच्या प्रयत्नात आहे, पण मुलाने आक्रमक होऊन आईला दुष्टपणे ट्र्रॅक्टरखाली ढकलत आहे. 

Web Title: son crushes her mother under the tractor

व्हिडीओ गॅलरी