जावयाने केली सासऱ्याच्याच घरात चोरी

जावयाने केली सासऱ्याच्याच घरात चोरी

नांदुरा (बुलडाणा) : तालुक्यातील ग्राम चांदुरबिस्वा येथील इंदिरा नगर झोपडपट्टीतील एका बंद घराची खिडकी तोडून घरमालकाचे जावयानेच पेटीत ठेवलेले लाखो रूपयांचे दागदागिने व नगदी पैशावर डल्ला मारून गावातून पळ काढल्याची घटना घडलेली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील चांदुरबिस्वा येथील रहिवासी सै. मकसुद सै. हुसेन (वय ७०) हे २७ आॅक्टोबर रोजी सुरत (गुजरात) येथे राहणार्‍या आपल्या मुलीच्या घरी गेले होते. 12 नोव्हेंबर रोजी आपल्या घरी परत आले असता घराची खिडकी तुटलेली आढळली म्हणून त्यांनी किंमती ऐवज ठेवलेल्या पेटीचे कुलूप तुटलेले आढळली. ती पेटी उघडून पाहली असता त्यांना धक्का बसला. कारण पेटीत ठेवलेले रोख 90 हजार रूपये तसेच सोन्याच्या 2 गहूपोथ, कानातील जोड, कंगन, चांदीच्या चैनपट्या असा एकूण एक लाख 50 हजार रूपयांच्या ऐवजांची चोरी गेल्याचे आढळून आले. त्यांनी आजूबाजूस राहणार्‍यांना व आपल्या नातेवाईंकांना सदर चोरीची घटना सांगितली असता त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) शे.साहिल, शे.अब्बास याने माहिती दिली. त्याने यामध्ये सांगितले, की माझे वडिलांनी तुमच्या घराचे खिडकीतून आतमध्ये गेले होते व येताना त्यांच्या हाती एक थैली होती. तेथीलच संडासचे भिंतीवरून उडी मारली तेव्हा मला पाहताच सदर माहिती न देण्याची धमकी दिली.

अशाप्रकारे आपला सख्या जावायानेच बंद घरफोडी केल्याचे वृत्त ऐकून धक्काच बसला. तथाकथित जावई शे.अब्बास शे. ईलियास याचा शोध घेतला असता तो नवीन मोटारसायकल ( AT / 5993) विकत घेऊन घरी न येता बाहेरगावला फिरत असल्याचे समजले.

जावायाचा 8 दिवस शोध घेऊनही मिळून न आल्यामुळे शेवटी 20 नोव्हेंबर रोजी नांदुरा येथे हजर होऊन वरील चोरीप्रकरणी आपलाच जावई शे. अब्बास शे.ईलियास विरोधात लेखी तक्रार दाखल केली. याप्रकरणी ठाणेदार अरूणराव आगे यांचे मार्गदर्शनात कलम ३८०,४५७,५०६ भादंवि नुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास पोहेका साहेबराव सोनोने करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com