video : वाचा, सोनम वांगचूक काय म्हणाले? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

> शिक्षणाला पुस्तक, वर्ग, विद्यालयापर्यंत मर्यादित ठेवू नका 
> सातव्या प्राचार्य शिक्षण परिषदेचा समारोप 
> प्राचीन काळापासूनच उन्नत शिक्षण देण्याची पद्धती विकसित केली होती 
> सर्वांगीण विकासाची कल्पना साध्य होत नाही 

नागपूर : विद्यार्थ्यांच्या एक्‍सलन्सची गोष्ट आपण करतो. तो परीक्षेत अधिक गुणांनी उत्तीर्ण करणे समाजात प्रतिष्ठा मिळविणे अशी आपली अपेक्षा असते. शिक्षण ही संकल्पना पुस्तक, परीक्षा, वर्ग आणि विद्यालयातील शिक्षणापेक्षा मोठी असून त्याला तेवढ्यापुरते मर्यादित ठेवू नका, असे प्रतिपादन रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचूक यांनी केले. 

साऊथ पाइन्ट स्कूलतर्फे आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. सोनम वांगचूक म्हणाले, देशात प्राचीन काळापासूनच उन्नत शिक्षण देण्याची पद्धती विकसित करण्यात आली होती. ती पद्धती आपली होती.

आज आपण पाश्‍चिमात्य शिक्षण पद्धतीचे मानसिक गुलाम झाले आहोत. पाश्‍चिमात्य शिक्षणानुसार रिडिंग, रायटिंग आणि अर्थमॅटीकवर आधारलेला आहे. त्यात घोकंपट्टीवर भर देण्यात येतो. त्यामुळे सर्वांगीण विकासाची कल्पना साध्य होत नाही. ती केवळ "दिमागी कसरत' आहे. आज या शिक्षण पद्धतीला देशात महत्त्व येणे दु:खाची बाब आहे. याउलट भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वांगीण विकासावर आधारित शिक्षणाचा समावेश आहे. 

यावेळी विविध उदाहरणांतून प्राचीन शिक्षण पद्धतीचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार, देवेन दस्तुरे, डॉ. मृणालिनी दस्तुरे, डॉ. रसिका दस्तुरे, राजेश घई, ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध संशोधन पेपरचा समावेश असलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. परिषदेत उत्कृष्ट पेपर सादर करणाऱ्या प्राचार्यांना नचिकेता तर सोनम वांगचूक यांनाही सर्वोत्तम नचिकेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

शिक्षण पद्धतीत तीन "एच'चा समावेश
या पद्धतीमध्ये तीन "एच'चा समावेश करण्यात आला आहे. त्यात "हेड', "हॅन्ड' आणि "हार्ट'चा समावेश आहे. डोके म्हणजे मस्तीष्क हे चांगल्या विचारांनी प्रेरित असणे, हॅन्ड म्हणजे त्यात कौशल्य भरभरून होणे आणि ह्रदयात नेहमी दयाळूपणाचा भाव असावा. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी पाश्‍चिमात्य शिक्षण पद्धतीचा उपयोग न करता, प्राचीन पद्धतीनुसार अनुभवातून शिकविण्याची भावना रुजवावी. या परंपरेला विश्‍वव्यापी करावे, असेही ते म्हणाले. 

Image may contain: 5 people, people smiling, people standing
परिषदेत उत्कृष्ट पेपर सादर करणाऱ्या प्राचार्यांना नचिकेता तर सोनम वांगचूक यांनाही सर्वोत्तम नचिकेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

विजेत्या स्पर्धकांना नचिकेता पुरस्कार
यावेळी सोनम वांगचूक यांना "सर्वोत्तम नचिकेता' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय आजिवन नचिकेत पुरस्काराने प्राचार्या नीरू कपाई आणि प्राचार्या चॅटर्जी यांना प्रदान करण्यात आला. शिवाय परिषदेत आयोजित पेपर प्रेझेंटेशनमध्ये विजेत्या स्पर्धकांना नचिकेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समितीतील सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonam Wangchuk says, Don't limit education