सोनेगाव तलाव ओव्हर फ्लो

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

सोनेगाव तलाव ः शुक्रवारी पावसाने सुमारे साडेचार तास झोडपून काढल्याने सोनेगाव तलाव ओव्हर फ्लो झाला. पावसाचे पाणी जायला जागा नसल्याने सर्व पाणी तलावाशेजारी असलेल्या वस्त्यांमध्ये शिरले.

सोनेगाव तलाव ः शुक्रवारी पावसाने सुमारे साडेचार तास झोडपून काढल्याने सोनेगाव तलाव ओव्हर फ्लो झाला. पावसाचे पाणी जायला जागा नसल्याने सर्व पाणी तलावाशेजारी असलेल्या वस्त्यांमध्ये शिरले.

सोनेगाव तलावाच्या शेजारी शिवशक्ती ले-आउट, पॅराडाईज संकुल, स्वागत सोसायटी, सहकारनगर या वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. या भागात सुमारे तीनशे ते साडेतीनशे घरे आहेत. यापैकी काही घरांमध्ये पाणी शिरले. येथील नागरिकांच्या घरातील अंगणात गुडघाभर पाणी साचले आहे. रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. साडेचारच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
सोनेगाव तलावाच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात लोकवस्त्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे तलावाला येणारे पाणी अडले आहे. उन्हाळ्यामध्ये हा तलाव कोरडा पडतो. पावसाचे पडणारे पाणी हा एकमेव या तलावाचा स्रोत आहे. महापालिकेचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी या तलावाचे सौंदर्यीकरण केले. गाळ काढून खोलीकरण केले. तसेच लिकेजस बंद केले आहेत. त्यामुळे तलाव आता लवकर भरत नाही. मात्र, शुक्रवारी सलग चार तास पाऊस पडल्याने तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे रस्त्यांवरून येणारे पाणी वस्त्यांमध्ये घुसले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonegaon lake Over Flow