सोनिया गांधी यांची निवड शहाणपणाची ः रणजित देशमुख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः सोनिया गांधी यांना अध्यक्ष करण्याचा कॉंग्रेसचा निर्णय शहाणपणाचा आणि राजकीयदृष्ट्या फायद्याचा असल्याचे मत कॉंग्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांनी व्यक्त केले. गांधी घराणेच कॉंग्रेसला मजबूत नेतृत्व देऊ शकते असेही ते म्हणाले.

राहूल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. काही नावेही चर्चेत आली होती. असे असले तरी बैठकीत कोणाच्याच नावावर एकमत झाले नाही. शेवटी सोनिया गांधी यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. सोनिया गांधी या अनुभवी नेत्या आहेत. कठोर निर्णय घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. लोकसभेपासून तर पंचायत स्तरावरच्या व्यवस्थेची त्यांना बारकाईने माहिती आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
आरोप करण्याचा विरोधकांचा अजेंडा
गांधी घराण्याचा भारतीयांवर आजही प्रभाव कायम आहे. या घराण्याचे योगदानही मोठे आहे. गांधी परिवारावर घराणेशाहीचा आरोप करून त्यांना पक्षापासून दूर ठेवणे हा विरोधकांचा अजेंडाच आहे. स्वतःच्या फायद्यासाठी विरोधक हा मुद्दा वारंवार उकरून काढून कॉंग्रेसला डिवचत असतात. त्याकडे दुर्लक्ष करून सोनिया गांधी यांना अध्यक्ष करणे हा निर्णय शहाणपणाचा असल्याचे रणजित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi, The choice is wise ः Ranjit Deshmukh