"लकीर के इस तरफ'मध्ये विस्थापितांचे आक्रांदन! 

Medha patkar
Medha patkar

नागपूर : नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणामुळे लाखो शेतकरी, आदिवासी विस्थापित झाले. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात 34 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही संपूर्ण न्याय मिळू शकला नाही. विस्थापितांचे आक्रांदन मूळ नागपूरकर असणाऱ्या शिल्पा बल्लाळ यांनी "लकीर के इस तरफ' या माहितीपटातून मांडले आहे. 
नर्मदा खोऱ्यांतील आंदोलकांची भावना नागपूरकरांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने रविवारी कस्तुरबा भवन येथील सभागृहात हा माहितीपट दाखविण्यात आला. नागपूर एन्व्हायरमेंट फोरमतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुजरात व राजस्थानला सुजलाम्‌ सुफलाम्‌ करण्याचे स्वप्न दाखवीत या प्रकल्पाची पायाभरणी झाली. विस्तापितांनासुद्धा विकासाचे सोनेरी स्वप्न दाखविण्यात आले. परंतु, अनेक प्रश्‍न अनुत्तरित असल्याने मेधा पाटकर यांनी आंदोलन सुरू केले. त्याला विस्थापितांकडून मिळालेली साथ, सर्वांच्या साथीने पुढे जाणारे आंदोलन, विस्तापितांचे बुडालेले पारंपरिक व्यवसाय, आदिवासींवरील जुलूम माहितीपटातून मांडण्यात आला आहे. 
आजवर झाले ते फारच थोडे आहे. धरणाची उंची वाढल्याने आणखी घरे, गावे, संस्कृती सारेकाही कायमचे पाण्याखाली जाणार आहे. परंतु, पाणी मिळणार कुणाला, या प्रश्‍नाचे उत्तर अजूनही मिळू शकले नाही. धरणामुळे परिसर सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल, असे स्वप्न दाखविले गेले. पण, धरणामुळे नर्मदेला बकालरूप आले आहे. भयाण वास्तव, ग्रामस्थांचा अन्यायाविरुद्धचा लढाऊ बाणा या माहितीपटातून मांडण्यात आला आहे. या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com