"तो' आवाज मुन्ना यादवचाच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

नागपूर - नगरसेवक मुन्ना ऊर्फ ओमप्रकाश यादव आणि त्यांचा भाऊ बाला ऊर्फ मनोज यादव यांच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आले असून "तो' आवाज मुन्ना आणि बाला यादव यांचाच असल्याचा अहवाल सीआयडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केला आहे. 

लोलगे यांनी यादव बंधूंविरुद्ध सोनेगाव पोलिस ठाण्यात धमकी व खंडणीची तक्रार दिली आहे. त्यावरून यादव बंधूंविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परंतु, तपासात काहीच प्रगती झाली नसल्यामुळे लोलगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेतील माहितीनुसार, सोनेगाव येथील एका भूखंडावरून लोलगे, राहुल धोटे व मनीष गुडधे यांच्यामध्ये वाद सुरू आहे. या प्रकरणात मुन्ना यादव व बाला यादव यांनी लोलगे यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच, भूखंडावर सुरक्षा भिंत उभारण्यासाठी व पोलिसांना सांभाळण्यासाठी लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या वेळी लोलगे यांनी हे संभाषण रेकॉर्ड केले व त्याची ऑडिओ सीडी तयार केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

प्रकरणाचा तपास सीआयडी करीत आहेत. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सीआयडीला आवाजाचे नमुने तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. यानुसार सीआयडीने अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 जानेवारीला ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे ऍड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.

Web Title: Sound Munna Yadav CID