बापरे! पेरले 30 किलो बियाणे, उगवली केवळ 35 रोपे; कुणी केली गडबड?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

यंदाच्या हंगामातील बियाणे कंपनीच्या विरोधातील ही पहिली तक्रार आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांनी त्यांच्या शेतात पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. 

वर्धा : यंदा पाऊस तसा समाधानकारक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीही वेळेवर केली. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात 35 किलो सोयाबीन बियाणे पेरले. मात्र, त्यातून केवळ 35 रोपे उगवल्याने तेही अवाक्‌ झाले. दुबार पेरणी पाळी आल्याने या शेतकऱ्याने डोक्‍यावर हात मारून घेतला. 

शेतकऱ्याला बोगस बियाणे दिल्याचे सिद्ध झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्य प्रदेश येथील इगल कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाट पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी ही तक्रार दखल केली. यंदाच्या हंगामातील बियाणे कंपनीच्या विरोधातील ही पहिली तक्रार आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील गोविंदपूर येथील शेतकरी शीतल विठ्ठल चौधरी यांनी त्यांच्या शेतात पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. 

या तक्रारीवरून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह बियाणे विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह इतरांनीही शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत शीतल चौधरी यांच्या शेतात बियाणे उगवल्याचे दिसून आले नाही. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करीत जमिनीत पेरलेले बियाण्यांची तपासणी केली. या तपासणीत या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे पुढे आले. 

यावरून बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. या तक्रारीवरून मध्य प्रदेशच्या इगल सीड्‌स बायोटेक लिमिटेड या कंपनीविरोधात पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. एस. डेहनकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. 

ठळक बातमी : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

30 किलो बियाण्यांमध्ये उगविली 35 रोपे 
शीतल चौधरी आणि त्यांच्या शेतात सोयाबीनचे 30 किलो बियाणे पेरले. या बियाण्यांची पाहणी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असता त्यातून केवळ 35 रोपे उगवल्याचे दिसून आले. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sown seeds did not germinate