सोयाबीन उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

अमरावती : खासगी कंपन्यांची नफेखोरी व महामंडळाच्या तकलादू वृत्तीतून बियाणे न उगवण्याचे प्रकार शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहेत. याच प्रकारातून विभागातील सोयाबीन उत्पादकांचे झालेले नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.

अमरावती : खासगी कंपन्यांची नफेखोरी व महामंडळाच्या तकलादू वृत्तीतून बियाणे न उगवण्याचे प्रकार शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले आहेत. याच प्रकारातून विभागातील सोयाबीन उत्पादकांचे झालेले नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.
गतवर्षी सोयाबीनला 2,650 रुपये हमीभाव व दोनशे रुपये बोनस, असा प्रतिक्विंटल 2,850 रुपये भाव होता. मात्र, उत्पादन कमी असल्याने 3,100 ते 3,200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यंदा 2,850 रुपये हमीभाव व दोनशे रुपये बोनस, असा 3,050 रुपये प्रतिक्विंटल दर घोषित झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. मात्र, पाचवीला पुजलेला प्रकार पुन्हा समोर आला. विभागात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या जिल्हानिहाय अमरावती 285, अकोला 13, बुलडाणा 4, वाशीम 3 अशा 305 तक्रारी आहेत. अमरावती जिल्ह्यातील 285 तक्रारी 886 बॅगच्या आहेत. एक बॅग बियाण्यात एक एकरची पेरणी होते. 305 तक्रारींची बियाणे बॅग संख्या 950 ते 1,000 असण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम विदर्भात सोयाबीनचे बागायती शेतीत 12 तर कोरडवाहू शेतीत प्रतिएकर 8 क्विंटलचे उत्पादन होते. सरासरी 10 क्विंटल एकरी उत्पादन व प्रतिक्विंटल 3,400 रुपये दर (हमीभावापेक्षा 250 ते 300 रुपये अधिक) या हिशेबाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
कंपन्यांनी अमरावती जिल्ह्यात 204 प्रकरणात 660 बॅगची बियाणे बदल स्वरूपातील दिलेली मलमपट्टीयुक्त भरपाई केवळ 1.23 लाखांच्या घरात आहे. पेरणीचा खर्च शिवाय पेरणीचा वेळ निघून गेल्याने बियाणे बदलाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा झालेला नाही.

 

Web Title: soyabean news