आता बोला! नक्षलवाद्यांनी टाकली निवडणुकीवर बहिष्काराची पत्रके

file photo
file photo

गडचिरोली : येत्या सोमवारी (ता. 21) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचा निषेध करावा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी पत्रकातून केले आहे. भामरागड तालुक्‍यातील मल्लमपोदूर गावाजवळ शुक्रवारी (ता. 18) नक्षली पत्रक व बॅनर सापडले. एटापल्ली तालुक्‍यात पुन्हा दोन वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली.
निवडणुकीच्या काळात हिंसक घटना, जाळपोळ तसेच बहिष्काराबाबत नेहमीच नक्षल संघटना
सक्रिय असतात. यंदाही एटापल्ली तालुक्‍यात मागील दोन दिवसांत रस्त्याच्या कामावरील तीन वाहनांची जाळपोळ केल्यानंतर शुक्रवारी भामरागड तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणारे पत्रके टाकली. पोलिसांनी ही पत्रके जप्त केली आहेत.
मतदानासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने नक्षली हालचाली वाढल्याने नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, आलापल्ली येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर प्रचार सभा झाली. यासाठी सर्वत्र चोख सुरक्षा असतानाही नक्षलवाद्यांनी मल्लमपोदूर गावात पत्रक टाकल्याने दुर्गम गावात दहशत पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com