गडचिराेली : नक्षलवाद्यांकडून विशेष पोलिस अधिकाऱयाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मालू मटटामी (वय 36) (रा. नैनवाडी) या विशेष पोलिस अधिकारीची नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशन हद्दीतील गिलनगुड़ा गावाजवळ मालू मटटामी (वय 36) (रा. नैनवाडी) या विशेष पोलिस अधिकारीची नक्षल्यांनी गोळ्या घालून हत्या केली आहे.

मालू मटटामी काही वर्षापूर्वी नक्षल चळवळीत सहभागी होते, त्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते, त्यानंतर ते विशेष पोलिस अधिकारी म्हणून पोलिसांत काम करीत होते. 

दरम्यान, (ता.10) मंगळवारी त्यांचे नक्षल्यांनी अपहरण केले होते, त्यानंतर रात्री दरम्यान नक्षल्यांनी त्यांची गिलनगुड़ा गावाजवळ हत्या करण्यात आली हाेती. सदर घटना बुधवारी नागरिकांच्या लक्षात आली. सदर माहिती गट्टा पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास गट्टा पाेलिस करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special police officer killed by Naxals in gadchiroli