उद्या रेल्वेद्वारे भुसावळ-बडनेरा दरम्यान विशेष ब्लॉक 

The special railway block between Bhusawal Badnera tomorrow
The special railway block between Bhusawal Badnera tomorrow

अकोला : मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाद्वारे पुलाचे बांधकाम काम करण्यासाठी 13 मे ला विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे सामान्याद्वारे प्राधान्य दिल्या जाणाऱ्या तीन महत्वाच्या पॅसेंजर रद्द करण्यात आल्या आहेत. 

भुसावळ विभागांर्गत येणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्यावतीने कळविण्यात आले आहे. यामुळे गरिब प्रवाशांद्वारे प्राधान्य देण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 51183 डाउन भुसावल-नरखेड पॅसेंजर ही 13 मे ला रद्द करण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक 51184 अप नरखेड- भुसावळ पॅसेंजर ही 14 मे ला रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 51182 अप नरखेड- नवी अमरावती पॅसेंजर 13 मे, गाडी क्रमांक 51151 डाउन नवी अमरावती- नरखेड पॅसेंजर 14 मे, गाडी क्रमांक 51197 डाउन भुसावळ- वर्धा पॅसेंजर 13 मे ला रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी क्रमांक 51198 अप वर्धा-भुसावळ पॅसेंजर 14 मे ला रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com