रेल्वेप्रवासातून घडणार महामानवाचे दर्शन

भूषण काळे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

अमरावती : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सन्मान करीत समानता एक्‍स्प्रेस पर्यटक गाडी लवकरच चालविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रसंगी भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीच्या सहकार्याने समानता एक्‍स्प्रेस चालविण्याचे जाहीर केले आहे. लवकरच प्रवाशांना या पर्यटक गाडीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घडणार आहे. भारतीय रेल्वेची ही विशेष पर्यटक गाडी दीक्षाभूमी नागपूरपासून सुरू होईल. 12 दिवसांच्या दौऱ्यात ही पर्यटक गाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांवर जाऊन भारतभ्रमण करेल.

बाबासाहेबांचे जन्मस्थान महू (इंदूर), मुंबई, बोधगया, सारनाथ, कुशीनगर आणि लुंबिनी (नेपाळ) यासारख्या बौद्ध धम्माशी संबंधित ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. पर्यटक गाडी सर्व समावेशक टूर पॅकेज देईल. ज्यामध्ये रेल्वेप्रवास, रस्ते स्थानांतर आणि बसद्वारे पर्यटनस्थळ, धर्मशाळेतील निवास अशी व्यवस्था राहील. यासाठी प्रवाशांना प्रतिव्यक्ती 11 हजार 340 रुपये द्यावे लागतील. आयआरसीटीसीच्या पर्यटन संकेतस्थळावर समानता एक्‍स्प्रेसची प्रवासतिथी व ट्रेन टूर पॅकेज लवकरच उपलब्ध होईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. देशभरात असलेल्या आयआरसीटीसी कार्यालयातील कुठल्याही ऑफिसमध्ये टूर पॅकेज ऑफलाइन बुक केले जाऊ शकेल.

Web Title: special railway news