संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

दिवाळीत नव्या जोमाने धावणार लालपरी

अमरावती : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळी निमित्ताने लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन केले असून त्यासाठी आगाऊ आरक्षणाची व्यवस्थाही आहे.

दिवाळी सणाच्या दिवसात बाहेर जिल्ह्यातील बरेच जण अमरावतीत आणि अमरावती जिल्ह्यातील हजारो प्रवासी पुणे, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यात जातात. प्रवाशांना सोईचे व्हावे याकरिता ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान पुणे - अमरावती बसफेऱ्या तर, परत जाण्याकरिता १६ ते २१ नोव्हेंबर अमरावती पुणे या अतिरिक्त एस.टी. बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी नऊ ते रात्री सवाआठपर्यंत या बसफेऱ्यांचे सुटण्याचे नियोजन करण्यात आले. सुटीच्या कालावधीतच प्रवाशांच्या सुविधेसाठी लांब व मध्यम पल्ला, आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. अमरावती, औरंगाबाद, पुणे, जालना, बल्लारपूर, नागपूर, माहूर, भोपाळ, खंडवा, छिंदवाडा, इत्यादी बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध राहतील.

लॉकडाउनच्या काळात एसटीची सेवा ठप्प पडली होती. त्यामुळे उत्पन्नात सुद्धा घट आली. त्यातून कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा बरेच महिने थकीत राहिले. लॉकडाउन काळात अमरावती आगाराचे दर महिन्याला अंदाजे १५ कोटीचे उत्पन्न बुडाले. दररोजचा विचार केल्या स्थानिक आगाराचे उत्पन्न हे ५० लाखांच्या घरात होते असे विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी सांगितले. सद्य:स्थितीत कोवीड-१९ चे नियम लक्षात घेता, सोशल डिस्टसिंग पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे प्रवासी पूर्ण क्षमतेने एसटीने जातील किंवा नाही. याबाबत संभ्रम आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ही सुरक्षित सेवा आहे. पूर्ण क्षमतेने वाहतुकीची परवानगी शासनाने दिली. नागरिकांनी नियमीत व जादा बसफेऱ्या या सुविधेचा लाभ घ्यावा.
- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक, अमरावती.  

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com