पुण्यासाठी अमरावतीवरून स्पेशल ट्रेन

File photo
File photo

अमरावती ः गणेश चतुर्थी तथा इतर सणासुदीला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मुंबई आणि पुण्यासाठी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई तथा पुण्यात विदर्भातील मोठ्या प्रमाणावर युवक-युवती नोकरीसाठी आहेत. ट्रॅव्हल्सचालकांचा मनमानी कारभार तथा भरमसाठ दरांमुळे प्रवाशांना नाइलाज राहतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्यरेल्वेने हा निर्णय घेतला आहे. नागपूर-मुंबई आणि अमरावती-पुणे या स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 01202 ही नागपूर- मुंबई (वन वे ट्रिप ) विशेष ट्रेन 25 ऑगस्टला दुपारी 3 वाजता नागपूर स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 20 मिनिटाला ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई स्टेशनला पोहोचेल. वर्धा, पुलगाव, धामणगावरेल्वे, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्टेशनवर ही गाडी थांबेल. थर्ड एसीचे दोन कोच, स्लीपरचे 12 कोच आणि 4 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे या गाडीला राहतील.

अमरावती-पुणे वन वे ट्रिप ही स्पेशल ट्रेन
गाडी क्रमांक 01240 ही 28 ऑगस्टला अमरावती स्थानकावरून दुपारी 1 वाजून 30 मिनिटाला प्रस्थान करेल. दुसऱ्या दिवशी 2 वाजून 45 मिनिटाला ही गाडी पुणे स्थानकावर पोहोचेल. बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या स्टेशनवर ही गाडी थांबेल. थर्ड एसीचे दोन डबे, स्लीपर क्‍लासचे 5 आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे 12 डबे या गाडीला राहतील.
विशेष शुल्कावरील 01202 आणि 01240 या गाडीचे बुकिंग इंटरनेट व सर्व पीआरएस स्थानकावर दिनांक 23 ऑगस्टला करता येईल. सामान्य द्वितीय श्रेणीचे तिकिटे यूटीएसमार्फत बुक करता येईल, असे रेल्वेने कळविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com