वैष्णोदेवी, बिकानेरसाठी विशेष गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

नागपूर - रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. याच श्रुंखलेत नागपूरमार्गे कटरा-यशवंतपूर आणि बिकानेर-सिकंदराबाद या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. 

नागपूर - रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. याच श्रुंखलेत नागपूरमार्गे कटरा-यशवंतपूर आणि बिकानेर-सिकंदराबाद या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. 

उन्हाळी सुट्या व लग्नसराईमुळे रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी होत आहे. अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. कटरा-यशवंतपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष 18 मार्च ते 28 जूनदरम्यान एकूण 30 फेऱ्या करेल. ही गाडी 18 मार्च ते 24 जूनदरम्यान प्रत्येक शनिवारी सकाळी 11.30 वाजता यशवंतपूर स्थानकावरून रवाना होऊन तिसऱ्या दिवशी रात्री 8.25 वाजता कटरा स्थानक गाठेल. दरम्यान, 19 मार्च ते 25 जूनदरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी 1.30 वाजता ही गाडी नागपूर स्थानक गाठेल. तसेच 21 मार्च ते 27 जूनदरम्यान प्रत्येक मंगळवारी पहाटे 5.40 वाजता ही गाडी कटरा स्थानकावरून रवाना होऊन प्रत्येक बुधवारी नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी यशवंतपूर स्थानक गाठेल. या गाडीला एक द्वितीय श्रेणी, तीन तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ स्लिपर कोच राहतील. सिकंदराबाद-बिकानेर विशेष गाडी 9 एप्रिल ते 28 जूनदरम्यान 24 फेऱ्या करेल. प्रत्येक रविवारी सकाळी 11 वाजता सिकंदराबाद स्थानकावरून रवाना होऊन प्रत्येक रविवारी रात्री 9 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री 12.40 वाजता नागपूर स्थानक गाठेल. प्रत्येक बुधवारी दुपारी 2.50 वाजता ही गाडी बिकानेर स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी 4.40 वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मध्यरात्रीनंतर 3.30 वाजता ही गाडी सिकंदराबादला पोहोचेल. 

डोंगरगडसाठी विशेष सुविधा 
चैत्र नवरात्रीनिमित्त बम्लेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी डोंगरगड स्थानकावर विशेष सुविधा केली आहे. या मार्गाने जाणाऱ्या अनेक गाड्यांना डोंगरगड येथे थांबा देण्यात आला असून, बऱ्याच गाड्यांचा मार्ग वाढविण्यात आला आहे. शिवाय शिवनाथ एक्‍स्प्रेसला 27 मार्च ते 5 एप्रिलदरम्यान आणि नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्‍स्प्रेसला 28 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान अतिरिक्त जनरल डबा लावण्यात येईल. 

Web Title: special train for vaishno devi ,bikaner