सांस्कृतिक भवनात खासगी "दुकानदारी'

file
file

उमरेड (जि.नागपूर)ः आपतूर येथील विद्यमान उपसरपंचाचे चुलतबंधू यांचे कृषी सेवा केंद्र सुरू आहे. हे केंद्र गावातील सांस्कृतिक भवनातून चालवितात. याबाबतची तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्यानंतर प्रकरण विभागीय आयुक्‍तांपर्यंत पोहोचले. विभागीय आयुक्‍तालयाने प्रकरणाची नोंद घेतली. सोमवारी या प्रकणावर सुनावणी करण्यात येईल. मात्र, सांस्कृतिक भवन रिकामे करण्याऐवजी पुन्हा त्यात कृषी सेवा केंद्रातील माल भरण्यात आला. प्रशासनाच्या कार्यवाहीला न जुमानता सांस्कृतिक केंद्राचा वापर स्वतःसाठी करण्यात येत असल्यामुळे जनमानस संतप्त झाले आहे. या प्रकरणावर सोमवारी विभागीय आयुक्‍त कार्यालयाकडून सुनावणी होणार आहे.

तालुक्‍यातील आपतूर येथे ग्रामस्थांना लहानमोठे सांस्कृतिक कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने शासनाच्या स्थानिक विकास योजनेअंतर्गत सन 2012-13 काळात बारसुजी ले-आउट परिसरात बांधून दिलेले सार्वजनिक सांस्कृतिक भवन हे गेल्या 4-5 वर्षांपासून विद्यमान उपसरपंच यादव इटनकर यांचे चुलतबंधू गोविंदा इटनकर यांच्या ताब्यात असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
माहिती मिळताच "सकाळ'मधून "सांस्कृतिक भवनाचे झाले कृषी केंद्र' अशा आशयाच्या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित झाले होते. गावकऱ्यांच्या वतीने तक्रारकर्ते भगवान डहाके यांनी दोन महिन्यांपूर्वी 9 ऑक्‍टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सभागृहाच्या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर "सकाळ'मधून सलग दोन दिवस वृत्त प्रकाशित झाल्यानंतर 27 नोव्हेंबरला अर्जदार भगवान डहाके यांना विभागीय आयुक्त कार्यालयातून पत्र आले. गैरअर्जदार उपसरपंच यादव इटनकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करून त्यांना अपात्र घोषित करण्याबाबत केलेल्या डाहाके यांच्या विनंतीअर्जावर उत्तर देत या 2 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे कळविले आहे.

प्रशासनालाही जुमानत नाही
सार्वजनिक सभागृहातील कृषी केंद्राचा माल अद्याप काढलेला नाही. त्यात पुन्हा नवीन मालाची भर झाल्याचे दिसून येते.
-भगवान डहाके, ग्रामस्थ

सचिवांनी केला खुलासा
समाजभवन रिकामे करण्याचा ठराव झालेला आहे. त्यावर ग्रामपंचायत काय कारवाई करेल, याबाबत ग्रामपंचायत सचिवाकडे खुलासा मागितला होता. तेव्हा सचिवांनी खुलासा दिला. त्यात मासिक सभेत ठराव घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
-सुभाष सानप
विस्तार अधिकारी, पंचायत समिती, उमरेड  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com