राज ठाकरे यांच्या स्वागताचा दिमाखदार कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

खामगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता. 24) शहरात विकमसी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

खामगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता. 24) शहरात विकमसी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दोऱ्यावर असून मंगळवारी ते शेगाव येथे मुक्कामी होते. सकाळी त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यांनतर विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. खामगाव येथे त्यांचे आगमन झाल्यावर विकमसी चौकात भव्य स्वागत झाले. यावेळी जमलेल्या शेकडो कार्यकर्ते व चाहत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशी  घोषणाबाजी व फटाक्यांची आतषबाजी करून परिसर दणाणून सोडला. राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भव्य आकर्षक मंच, टॉवर उभारण्यात आला होता. तसे मनसेचे फलक, फुगे व फुलांनी मंच सुशोभित करण्यात आला होता. शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारून राज ठाकरे यांनी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यार्थी अभ्यासिकेला भेट दिली व त्यानंतर त्यांचा ताफा रवाना झाला. 

स्वागताचे उत्कृष्ट नियोजन

खामगाव येथील राज ठाकरे यांच्या स्वागत कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मनसेचे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या नियोजनात जिल्हाध्यक्ष बाबा काळे, शहराध्यक्ष नंदू भट्टड यांनी स्वागत सोहळ्याचे उत्कृष्ट असे नियोजन केले. राज ठाकरे यांचे आगमन होताच विकमसी चौक मनसेच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता.

Web Title: A spectacular program of Raj Thackeray welcome