ॲक्‍टर नहीं... ‘खिलाडी’ हूँ !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - ‘मैं ॲक्‍टर बाद में बना. सबसे पहले मैं एक स्टंटमन हूँ, एक खिलाडी हूँ’... या शब्दांत बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार याने आज नागपुरातील खेळाडूंचे मन जिंकले. अक्षयची फिल्मी एन्ट्री आणि धक्का देणारे स्टंट खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्याची खरी शान ठरले. 

नागपूर - ‘मैं ॲक्‍टर बाद में बना. सबसे पहले मैं एक स्टंटमन हूँ, एक खिलाडी हूँ’... या शब्दांत बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार याने आज नागपुरातील खेळाडूंचे मन जिंकले. अक्षयची फिल्मी एन्ट्री आणि धक्का देणारे स्टंट खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळ्याची खरी शान ठरले. 

मानकापूर स्पोर्टस कॉम्प्लेक्‍समध्ये झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धनसिंह राठोड आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांची प्रमुख उपस्थिती होती. जवळपास दीड तास प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांना अक्षयकुमारने डॅशिंग एन्ट्रीतच खूश केले. त्याच्या चित्रपटांमधील गाजलेल्या संवादांसोबत झालेली एन्ट्री सर्वांना सुखद धक्का देणारी ठरली. ‘नागपूरला येऊन मला खूप आनंद होतोय. नितीन गडकरींमुळे तुमच्यासोबत भेट घडून आली, त्यामुळे विशेष आभारी आहे’, या अस्सल मराठी शब्दांमध्ये त्याने नागपूरकरांना अभिवादन केले. ‘खेळाचा विषय निघाल्यावर मी कुणालाही टाळत नाही. माझ्या वडिलांनी मला ‘चॅम्पियन’ होण्याचा मंत्र दिला. इथे असलेल्या पालकांनीही आपल्या मुलांना हाच मंत्र द्यावा. ‘आय एम द चॅम्पियन’ हे वाक्‍य कायमस्वरूपी डोक्‍यात ठेवा,’ असे आवाहन त्याने सर्वांना केले. निरोप देताना त्याने सर्वांसोबत ‘सुनो गौर से दुनियावालों’ हे गीत गायले. सेल्फीचा उत्साह , ‘अक्षय अक्षय’चा नाद, प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची चढाओढ असा एकूणच माहोल रंगला होता. अक्षयने किक मारून धाडलेला फुटबॉल मिळविण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती.

स्टेजवरून घेतली उडी!
खेळाडू विविध क्रीडाप्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवीत असताना अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते. प्रत्येकाचे कौशल्य अक्षय पूर्णवेळ लक्ष देऊन बघत होता. अमित स्कूलचे विद्यार्थी योग करीत असताना अक्षयने नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली आणि अचानक स्टेजवरून थेट खाली उडी घेतली. स्टेजवरील पाहुण्यांसह संपूर्ण सभागृहासाठी तो मोठा धक्का होता. अक्षय थेट योग करणाऱ्या मुलांमध्ये येऊन पोहोचला. त्यांच्यासोबत काही स्टेप्स करण्याचीही त्याची इच्छा होती. पण अवघ्या काही सेकंदात चाहते त्याच्यावर तुटून पडले. त्यामुळे त्याला स्टेजवर माघारी यावे लागले.

Web Title: sports mahotsav actor akshay kumar khiladi