देशात हवी शारीरिक साक्षरता - पी. गोपीचंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - पूर्वीच्या काळात देशात शारीरिक साक्षरता अर्थात ‘फिजिकल लिटरसी’वर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायचे. अलीकडच्या काळात शिक्षणाला अत्याधिक झुकते माप दिले जात असल्यामुळे खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर उंच झेप घेण्यासाठी पुन्हा शारीरिक साक्षर व्हावे लागेल, असे प्रतिपादन बॅडमिंटन प्रशिक्षक पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांनी केले.

नागपूर - पूर्वीच्या काळात देशात शारीरिक साक्षरता अर्थात ‘फिजिकल लिटरसी’वर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायचे. अलीकडच्या काळात शिक्षणाला अत्याधिक झुकते माप दिले जात असल्यामुळे खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे.

भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर उंच झेप घेण्यासाठी पुन्हा शारीरिक साक्षर व्हावे लागेल, असे प्रतिपादन बॅडमिंटन प्रशिक्षक पद्मभूषण पुलेला गोपीचंद यांनी केले.

विभागीय क्रीडासंकुलात रविवारी आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर सिने अभिनेता अक्षयकुमार, महापौर नंदा जिचकार, खासदार विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ. अनिल सोले, कृष्णा खोपडे, नागो गाणार, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर प्रवीण दटके, महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी होते.

आज शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळही आवश्‍यक आहे. मुले मैदानावर गेली, तरच देशात मोठ्या प्रमाणावर खेळाडू घडतील. एकेकाळी देशात खेळाचे वातावरण होते. त्यामुळे घराघरांत खेळाडू दिसायचे. देशात सर्वत्र शारीरिक साक्षरता होती. दुर्दैवाने खेळाडू कमी झाले आहेत. ही परंपरा मोडीत निघण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही गोपीचंद म्हणाले.

पालकांनी मुलांना खेळासाठी प्रेरित केले, तर भारत नक्‍कीच क्रीडा क्षेत्रात उंच झेप घेऊ शकतो. एकेकाळी योग, कुस्ती, मल्लखांबसारखे देशी खेळ भारताची ओळख होती. मात्र, ऑलिम्पिक पदकासाठी आम्ही विदेशी खेळांच्या मागे लागलो आहोत. खासदार क्रीडा महोत्सवासारख्या माध्यमातून देशी खेळांना चालना मिळायला हवी, असेही गोपीचंद म्हणाले. प्रास्ताविक संदीप जोशी यांनी केले.

क्षणचित्रे
 जवळपास दीड तास उशिरा सुरू झालेल्या उद्‌घाटन समारंभाचा खिलाडी अक्षयकुमार आकर्षणाचे केंद्र होता. इनडोअर स्टेडियममध्ये पाच हजारांवर खेळाडू, विद्यार्थी व क्रीडाप्रेमींनी गर्दी केली.
 उद्‌घाटन समारंभात शहरातील शालेय मुला-मुलींनी रंगारंग व चित्तवेधक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रमुख पाहुण्यांसह उपस्थितांची मने जिंकली.
 केशवनगर माध्यमिक विद्यालयाचे बॅण्डपथक, लेझीम व ढोलपथक, चिमासाहेब भोसले व्यायामशाळेच्या मुलांनी सादर केलेल्या शिवकालीन तलवार व दांडपट्ट्याच्या चित्तथरारक कसरती व प्रात्यक्षिकांनी वाहवा मिळविली.
 अमित स्कूल योगा ग्रुप, भूमिपुत्र ग्रुप, जल्लोष बॅण्ड आणि मुंबईहून आलेल्या बॉडीबिल्डर्सनीही माहोल केला.

मुलांनो, मैदानावर या
खेळामध्ये देशाची प्रतिमा बदलण्याची क्षमता आहे. ‘स्पोर्टस कल्चर’ निर्माण करण्यासाठी लवकरच आठ ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी देशभर ‘टॅलेंट सर्च’ राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून एक कोटी मुलांची चाचणी घेऊन २० हजार प्रतिभावान खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या खेळाडूंना आधुनिक प्रशिक्षण देऊन २०२४ व २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी तयार केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिली.

शहराला मिळणार नवी ओळख
खासदार क्रीडा महोत्सव शहरातील युवा खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. ही स्पर्धा शहराला नवी ओळख मिळवून देणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने चमकणारे खेळाडू भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतील. महोत्सवात सहभागी खेळाडूंना ‘मोटिव्हेट’ करण्यासाठी नागपूरकर क्रीडाप्रेमींनी मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सवाचे आयोजक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Web Title: sports mahotsav p. gopichand