अतिपावसामुळे संत्र्याला बुरशीजन्य रोगांची लागण, फळगळती वाढली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण केल्यास नुकसानाचा खरा अंदाज पुढे येईल. संत्रा व मोसंबी या फळांचीदेखील बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात गळण होत आहे. अंबिया बरोबर मृग बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

तालुक्‍यात यंदा खरीप हंगामात कपाशी तसेच सोयाबीन पिकांची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा विमा उतरविला आहे. महसूल विभागाने नुकसानाचा अहवाल विमा कंपनीला दिल्यास त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्यास मदत होईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी. नदी व नाल्या काठावरील शेतीचे व त्यातील पिकांचे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनादेखील अनुदान देण्यात यावे. अशा नुकसानामुळे नरखेड तालुक्‍यातील शेतकरी चिंतित आहे, अशी प्रतिक्रिया माजी सभापती वसंत चांडक यांनी दिली आहे. 
मागील वर्षी दुष्काळामुळे संत्रा व मोसंबी बागायतदार अडचणीत आले होते. यंदा सुरुवातीला पावसाचे प्रमाण चांगले असल्याने संत्रा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, सततच्या पावसामुळे संत्रा उत्पादकांवर बुरशीजन्यरोगांमळे नवी अडचण निर्माण झाली आहे. संत्रा बागायतदारांना मदत करण्याची गरज असल्याचे मत आता व्यक्त करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spread of fungal infections to oranges