पेपर सोडविताना शिक्षकही घामाघूम!

मंगेश गोमासे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

नागपूर - दहावीतील इंग्रजी विषयाच्या बदलत्या अभ्यासक्रमाला अनुसरून यंदा तयार करण्यात आलेली नव्या स्वरूपाची प्रश्‍नपत्रिका सोडविताना खुद्द शिक्षकांनाच घाम फुटला. त्यांना तीन तासांच्या नियोजित वेळेत प्रश्‍नपत्रिका सोडविता आली नाही. इतकी अवघड प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांवर लादण्यात येणार असल्याने यंदा निकालाचे वाटोळे होण्याची भीती आहे.

नागपूर - दहावीतील इंग्रजी विषयाच्या बदलत्या अभ्यासक्रमाला अनुसरून यंदा तयार करण्यात आलेली नव्या स्वरूपाची प्रश्‍नपत्रिका सोडविताना खुद्द शिक्षकांनाच घाम फुटला. त्यांना तीन तासांच्या नियोजित वेळेत प्रश्‍नपत्रिका सोडविता आली नाही. इतकी अवघड प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांवर लादण्यात येणार असल्याने यंदा निकालाचे वाटोळे होण्याची भीती आहे.

यावर्षीपासून दहावीच्या इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला. या बदलामध्ये काही प्रमाणात चुकाही झाल्याची बाब निदर्शनास आली. त्या चुका दुरुस्त करण्याऐवजी विभागाकडून त्यासह प्रश्‍नपत्रिका तयार करण्याचे काम केले. प्रश्‍नपत्रिका तयार करताना, त्यामध्ये विचारलेले प्रश्‍न हे पुस्तकांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारावर असावेत हे गृहीत होते. मात्र, प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न क्रमांक ‘तीन बी’ मधील ‘समरी रायटिंग’ हा भाग अभ्यासक्रमाबाहेरील आहे. त्यामुळे ही प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी तीन तासांचा वेळ कमी पडतो. विशेष म्हणजे प्रशिक्षणादरम्यान बऱ्याच शिक्षकांनी तज्ज्ञ शिक्षकांना या विषयावर प्रश्‍न उपस्थित केले. परंतु यापैकी एकाही प्रश्‍नाचे उत्तर तज्ज्ञांकडून मिळाले नाही. 

प्रश्‍नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करताना, विद्यार्थ्यांचे वय, आकलन क्षमता, दर्जाचा विचार करणे आवश्‍यक आहे. 

राज्यात १७ लाख विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसतात. प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप ठरविताना, विविध ठिकाणच्या किमान १ हजार ७०० विद्यार्थ्यांना बदललेली प्रश्‍नपत्रिका दिलेल्या वेळेत सोडविता येते काय? हे तपासणे आणि किमान १७० शिक्षकांना त्याची तपासणी करता येते काय याची पडताळणी करणे गरजेचे असते. यापैकी एकही बाब विभागाकडून करण्यात आलेली नाही.

मुंबईच्या प्राध्यापकाचे सचिवांना पत्र 
प्रश्‍नपत्रिकेवर मुंबईतील अविनाश कुळकर्णी या प्राध्यापकाने आक्षेप घेत थेट राज्याच्या शिक्षण सचिवांना पत्र पाठविले. पत्रात पाठ्यपुस्तक आणि मूल्यमापन यासंदर्भात देण्यात आलेल्या एका दिवसाच्या प्रशिक्षणावर आक्षेप घेतला. त्यात विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली नसल्याची तक्रार नोंदविली आहे. त्यावर शिक्षण सचिवांनी मौन पाळले आहे.

Web Title: SSC Exam Paper Teacher English Subject

टॅग्स