दहावीची आजपासून परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

विदर्भातील तीन लाख 75 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या, मंगळवारपासून सुरवात होत आहे. अमरावती विभागातील एक लाख 87 हजार 602 तर नागपूर विभागातील एक लाख 87 हजार 837 असे विदर्भातील एकूण तीन लाख 75 हजार 439 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

विदर्भातील तीन लाख 75 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
नागपूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या, मंगळवारपासून सुरवात होत आहे. अमरावती विभागातील एक लाख 87 हजार 602 तर नागपूर विभागातील एक लाख 87 हजार 837 असे विदर्भातील एकूण तीन लाख 75 हजार 439 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

जीवनातील पहिला "टर्निंग पॉइंट' म्हणून दहावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. उद्या, मंगळवारपासून ही परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी अमरावती जिल्ह्यातून 47 हजार 254, अकोला 31 हजार 579, बुलडाणा 42 हजार 838, यवतमाळ 43 हजार 863, तर वाशीम जिल्ह्यातून 22 हजार 68 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विभागातील 686 केंद्रांवरून ही परीक्षा होणार आहे. परीक्षेच्या काळात कॉपींवर अंकुश लावण्यासाठी विभागात 25 अतिरिक्त भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. एक एप्रिलपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विशेष म्हणजे यावेळी परीक्षा केंद्रात मोबाईल नेण्यावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणी मोबाईलसह आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील एकूण 682 केंद्रांवर एकूण एक लाख 87 हजार 837 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील 88 केंद्रावर 21 हजार 182, चंद्रपुरात 126 केंद्रावर 34 हजार 950, नागपुरात 222 केंद्रांवर 71 हजार 99, वर्धामध्ये 76 केंद्रांवर 20 हजार 704, गडचिरोलीत 72 केंद्रावर 16 हजार 688 तर गोंदिया जिल्ह्यातील 98 केंद्रांवर 23 हजार 36 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

हेल्पलाइनची सोय
परीक्षेला जाताना वा त्यापूर्वी परीक्षेचे टेन्शन वा त्याबद्दल कुठलीही समस्या उद्‌भवल्यास विद्यार्थी वा पालकांनी बोर्डाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहे, ते असे ः 9922453235, 9850246389, 9763667416, 9422053391, 9890144185.

बोर्डाचा सल्ला
- परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा केंद्र स्वत: पाहून खात्री करावी.
- रात्री झोपण्यापूर्वीच परीक्षेसाठी आवश्‍यक असलेले साहित्य तयार ठेवावे.
- रिसीटची झेरॉक्‍स काढून ठेवावी.
- परीक्षेला जाण्यापूर्वी हलका आहार घ्यावा.
- परीक्षेला वेळेच्या आत 30 मिनिटे पोहोचण्यासाठी शक्‍य तितके लवकर निघावे.
- परीक्षेला जाताना सोबत प्रवेशपत्र, ओळखपत्र व इतर आवश्‍यक साहित्य घ्यावे.
- परीक्षा दालनात प्रसन्न व आत्मविश्वासाने जावे.
- नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे अगोदर मिळालेल्या उत्तर पत्रिकेवर आवश्‍यक ती माहिती योग्य ठिकाणी भरावी.
- नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे अगोदर मिळालेल्या प्रश्‍नपत्रिकेचे फक्त वाचनच करावे.

Web Title: ssc exam start today