संग्रामपूरजवळ एसटीचा भीषण अपघात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एसटी यांच्यात जबर अपघात झाला. ही घटना शनिवार (ता.11) सकाळी 6.25 वाजता संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालकांसह 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाच जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. 

संग्रामपूर(बुलडाणा): संग्रामपूर ते वरवट बकाल रस्त्यावर रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि एसटी यांच्यात जबर अपघात झाला. ही घटना शनिवार (ता.11) सकाळी 6.25 वाजता संग्रामपूर जवळ घडली. यामध्ये दोन्ही वाहनाचे चालकांसह 10 ते 15 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाच जणांना उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. 

अपघात एवढा भीषण होता की, एसटी बस चालक जागेवरूनच फेकल्या गेल्याने विना चालक बस जवळपास 500 फुटाचेवर रस्त्याने चालत गेली. वाहकाने प्रसंगावधान राखत बसचे गियर कमी केल्याने बस रस्त्याच्या खाली थांबली. अपघातात ट्रॅक्टर-ट्रालीने चालकाच्या बाजूने बस चिरत नेली. ट्रॉली ही ट्रॅक्टरपासून वेगळी होऊन दूर फेकल्या गेली. प्राप्त माहिती नुसार, सोनाळा ते बुलढाणा एम एच 40 एन 9489 ही बस जळगाव जामोद येथे जात होती. तर ट्रॅक्टर-ट्रॉलीसह रेतीसाठी वरवट बकालकडे जात होते. संग्रामपूर स्मशानभूमीच्या वळणावर अपघात झाला. 

हेही वाचा - आमदार रायमुलकरांच्या वाहनाला अपघात

दहाहून अधिक प्रवाशी जखमी 
सकाळची वेळ व थंडी असल्याने जखमींना मदत मिळण्यास विलंब झाला. बस चालक व त्याचे मागील सीट वरील लहान मुले आणि प्रवाशी याना जबर मार लागला. तर ट्रॅक्टरची ट्रॉली तुटून पडल्याने ट्रॉली मधील मजूर व चालक ही गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस स्टेशन आणि 108 ला माहिती देऊन ही अपघाताची गंभीरता घेतल्या गेली नाही, असा जखमींसह प्रत्यदर्शीकडून आरोप होत आहे.

Image may contain: one or more people and outdoor

जखमींना उपचारासाठी  तर सतीश देशमुख, विलासराव देशमुख, हरिभाऊ राजनकर, संगीत सोनोने, धामोळे, गौतम तायडे, जयेश मारोठे, राजेश तायडे, याकूब भाई यांचेसह गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केल्याचे समजते.

Image may contain: sky and outdoor

दैव चागले म्हणून बरे..
अपघातग्रस्त बस विना चालक संग्रामपूरकडे चालत असताना मॉर्निग वॉक करणारे नागरिक रस्त्याने होते. याच रस्त्याने बसच्या बाजूने  विजेचे खांब होते. सुदैवाने बसचा या खांबांना स्पर्श झाला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: st and tractor crashes in Sangrampur Buldhana