तिवसा-मोझरी महामार्गावर एसटी बस उलटली

तळेगावठाकूर : खड्ड्यात उलटलेल्या बसची पाहणी करताना पोलिस.
तळेगावठाकूर : खड्ड्यात उलटलेल्या बसची पाहणी करताना पोलिस.

तळेगावठाकूर (जि. अमरावती) : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरीनजीक हॉटेल साईकृपाजवळ नागपूर येथून अमरावती जाणारी एसटी बस शनिवारी (ता. 17) रात्री 8 वाजता उलटली. यात सहा प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलिस व आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन विचारपूस केली.
नागपूर येथून अमरावतीला जाणारी (एमएच 40 वाय 5266) बस अचानकपणे अनियंत्रित झाली. त्यात बस महामार्गावरून रस्त्याच्या खाली खड्ड्यात उलटली. या बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते. यात चालक बाळू ठाकरे व वाहक सय्यद अन्सार होते.
पुंडलिक नारायण सोळंके (रा. तळेगाव श्‍यामजीपंत), मधुकर वामनराव अटाळकर (वय 80, रा. आसेगावपूर्णा) यांना हॉटेल साईकृपाचे मालक अफसर शेख यांनी आपल्या वाहनात बसवून तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अन्य चार जणांना मोझरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर, नगराध्यक्ष वैभव वानखडे, पांडुरंग मक्रमपुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताबाबत माहिती घेतली. या वेळी तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com