एसटी बसमधून आता वाय-फाय सुविधा

एसटी बसमधून आता वाय-फाय सुविधा

अमरावती - एसटी बसने प्रवास म्हटला तर बरेचजण नाक मुरडतात. मात्र, आता एसटीचा प्रवास करमणुकीसह राहणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये फ्री वायफाय सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे बसमध्ये प्रवास करताना तुम्ही मोबाईवर आता चित्रपटसुद्धा बघू शकणार आहे. अमरावती विभागात या सुविधेला प्रारंभ झाला असून प्रवासी त्याचा वापरदेखील करू लागले आहेत. 

एसटी महामंडळाच्या अमरावती आगारातील ७१ पैकी ५३ बसगाड्यांमध्ये फ्री वायफाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तथापि, या वायफायचा वापर कसा करायचा यासंबंधीची सूचना सर्वच एसटी बसगाड्यांमध्ये दर्शनी भागात लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फ्री वायफायच्या माध्यमातून प्रवाशांना ‘मोबाईल डाटा’ वापरता येणार नाही, तर  बसमध्ये लावण्यात आलेल्या या सुविधेत चार मराठी चित्रपट अपलोड करण्यात आलेले आहेत, तेच प्रवाशांना वायफायवर बघता येतील, अशी माहिती येथील आगार व्यवस्थापक उमेश इंगळे यांनी दिली. अचलपूर आगारातील तीन बसमध्ये तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे या बसमधील प्रत्येक प्रवाशाची हालचाल टिपली जाईल. यातून गुन्हेगारीवर वचक बसेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

असा करा वाय-फायचा वापर 
स्मार्ट फोनवर मोफत मनोरंजनासाठी मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन वायफाय-डब्ल्यूएलएएन सेटिंग सुरू करावी लागेल. वायफाय चालू झाल्यानंतर यादीत किव्ही (केआयव्हीआय) निवडून सेटिंगमधून बाहेर पडा. गुगल क्रोमवर जाऊन ब्राउजरची लिंक ओपन करून त्यात किव्ही डॉट कॉम टाइप करून एंटर करा. सर्व प्रक्रिया केल्यावर चार मराठी चित्रपटांपैकी कुठल्याही  चित्रपटाचा आनंद प्रवाशांना घेता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com