‘एसटी’तर्फे सात हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींना मोफत पास

विवेक मेतकर
बुधवार, 2 मे 2018

अधिकारी, पर्यवेक्षकांवर जबाबदारी 
विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून हुतात्मा जवान व त्यांच्या वीरपत्नीचे छायाचित्र प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांच्या पत्त्यावर भेट देऊन ही कार्यवाही राज्य परिवहन विभागातील अधिकारी, पर्यवेक्षकांना करावी लागत आहे. त्यानुसार  जिल्हा सैनिक अधिकारी यांच्याकडून यादी मागविली होती. सात जणांच्या नावाची यादी प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यांच्या पासचे ‘स्मार्ट कार्ड’ तयार करण्यात आले आहे.

अकोला : कर्तव्यावर असताना वीरमरण आलेल्या भारतीय सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील जवानांच्या वीरपत्नीला राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच बसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील सात विरपत्नींना मोफत पास उपलब्ध करुन देण्यात आली.

देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या वीरपत्नीला आधार देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सैन्यातील तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानांच्या वीरपत्नीला महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास योजना लागू केली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यभर या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

अधिकारी, पर्यवेक्षकांवर जबाबदारी 
विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून हुतात्मा जवान व त्यांच्या वीरपत्नीचे छायाचित्र प्राप्त करून घ्यायचे आहे. त्यासाठी त्यांच्या पत्त्यावर भेट देऊन ही कार्यवाही राज्य परिवहन विभागातील अधिकारी, पर्यवेक्षकांना करावी लागत आहे. त्यानुसार  जिल्हा सैनिक अधिकारी यांच्याकडून यादी मागविली होती. सात जणांच्या नावाची यादी प्राप्त झाल्यानंतर महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवर पाठवून त्यांच्या पासचे ‘स्मार्ट कार्ड’ तयार करण्यात आले आहे.

Web Title: st distribute free pass