यवतमाळात एसटीची सेवा कोलमडली

चेतन देशमुख 
शनिवार, 9 जून 2018

यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाने एसटीची सेवा कोलमडली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात संपाला समिश्र प्रतिसाद होता. आज दुसर्‍या दिवशी 95 टक्के कर्मचारी सहभागी झाल्याने लाल पतीची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.  

राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ अमान्य करुन संपाचे हत्यार उपसले. विशेष म्हणजे कुठल्याही संघटनेने अधिकृत भूमिका घेतली नाही, तरीही कर्मचाऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने संप सुरु केलाआहे. यवतमाळ विभागात दारव्हा, यवतमाळ, पुसद आदी आगारात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी संपात सहभागी झाले. जिल्ह्यातील 9 आगारातही 95 टक्के कर्मचारी संपात सहभागी झाले . प्रमाणात परिणाम झाला.  त्याचप्रमाणेप्रवाशांचचे हाल सुरू आहे. 

दुसऱ्या दिवशी जिल्हा संपाला जिल्हात मोठा प्रतिसाद मिळाला. संपावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आगारात पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे .

Web Title: st employees still on strike on second day