म्हातारीला तरुणीचा मेकअप!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

नागपूर : अलीकडे मधोमध पांढरा पट्टा असलेले नवीन एसटी धावत आहेत. आंतरबाह्य सुंदर रूपात दिसणारी ही बस नवी नव्हे तर जुन्याच चेसीसवर नव्याने बांधणी केल्याची बाब पुढे आली आहे. म्हाताऱ्या बाईला तरुणीचे मेकअप करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याची कोटी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.

एसटीकडून भंगार बसेस लिलावात काढून नवीन खरेदी केल्या जातात. लालपरीचे वयोमान सरासरी 12 वर्षे असते. परंतु, अनेकदा बसेस वयोमानापूर्वीच भंगार होतात. याबसेसची डागडुजी केली जाते. गरजेनुसार नवीन बसेसची खरेदी केली जाते. आर्थिक कोंडीतून जाणाऱ्या एसटी महामंडळाने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अजब धडपड चालविली आहे. आठ वर्षे जुन्या व कंडम झालेल्या बसेसच्या चेसीचवर नव्याने बांधणी करून नवीन स्वरूपातील बसेस तयार केल्या आहेत. आत आणि बाहेर आधुनिक लूक देऊन या बसेस पुन्हा रस्त्यावर उतरविल्या आहेत. एसटी बसेसच्या आधुनिक रूपामुळे प्रवासी आनंदीत आहेत. परंतु, हा आनंद अल्पकाळाचा असून लवकरच या बसेस भंगारात निघतील, अशी शंका खुद्द कार्यशाळेत कार्यरत एसटी कामगारच उपस्थित करीत आहेत.  
मुलामा दिलेल्या पाचशे बसेस रस्त्यावर
नागपूर, औरंगाबादजवळील चिकलठाणा आणि धापोडी येथे एसटीची रिबॉडी बिल्डिंग कार्यशाळा आहेत. नागपूरच्या कार्यशाळेत 160, चिखलठाण्यात 130 आणि धापोडीत सुमारे अडीचशे बसेसची बांधणी केल्याची माहिती आहे. आधुनिक मुलामा दिलेल्या सुमारे पाचशे बसेस रस्त्यावर धावत आहेत.  
तोट्याचा सौदा
बसबांधणीसाठी एसटी महामंडळाकडून ऍल्युमिनियमचा उपयोग होतो. यामुळे बसेस भंगारात निघाल्या तरी त्यांची चांगली किंमत मिळते. परंतु, जुन्या चेसीसवर नवीन बांधणी करताना एमएसचा (लोखंड) उपयोग केला आहे. यामुळे भंगार बसेसना पुरेशी किंमत मिळण्याची आस धुसर आहे. एमएसच्या वापराने बसचे वजन दोन टन अधिक वाढले. यामुळे डिझेलची खपत वाढणार आहे. एकूणच जुन्य बसेसना नवीन लूक देण्याचा ध्यास तोट्याचा सौदा ठरेल, असे मत अनुभवी कामगारांकडून व्यक्त करण्यात आले.

Web Title: ST news