एमआयडीसीतून स्टेज डान्सरचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर - लग्न, दारूपार्टी आणि स्टेज यासह अन्य कार्यक्रमात डान्स करणाऱ्या डान्सरचे एमआयडीसीतून दोन दलालांनी अपहरण केले. या प्रकरणी डान्सरच्या भावाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी दोघांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. राज ऊर्फ गोलू पटेल आणि विकास वर्मा (दोघेही रा. मंडी माहू, जि. जौनपूर-उत्तर प्रदेश) अशी दलालांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय राणी (बदललेले नाव) ही मूळची भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील रहिवासी आहे. घरची आर्थिक स्थिती खूपच नाजुक असल्याने तिचे मोठे भाऊ आणि बहीण नागपुरात गेल्या दोन वर्षांपासून एमआयडीसीतील एका कंपनीत मजूर म्हणून काम करतात. नाकी डोळी छान आणि दिसायला सुंदर असलेल्या राणीची २०१७ मध्ये जौनपूरमधील विकास वर्माशी फेसबुकवरून ओळख झाली. तो स्टेज डान्स आणि राजकीय लोकांच्या पार्टीत दारू वाटण्यासाठी मुलींना पुरविण्याचे काम करतो. राणीला डान्स शिकविण्याचे आणि स्टेजवर डान्सर म्हणून काम देण्याचे आमिष दाखवले. ती गेल्या वर्षी राज पटेल नावाच्या दलालासोबत उत्तर प्रदेशात गेली.

तेथे दोन महिने स्टेज आणि कार्यक्रमात डान्सर म्हणून काम केले. पैसा कमावून ती परत आली. त्यातून तिने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुन्हा उन्हाळ्यात ११ एप्रिलला विकास आणि राजने राणीला फोनवरून डान्सरचे काम देण्याचे आमिष दाखवले. ती दोघांसोबत इलाहाबाद येथे गेली. पोहोचल्यानंतर दोन दिवस ती भावाच्या संपर्कात होती. तेव्हापासून तिचा फोन बंद येत आहे. तिच्यासोबत कोणतीतरी वाईट घटना किंवा तिला सेक्‍स रॅकेटमध्ये अडकविल्याची भीती भावाने व्यक्‍त केली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एक पथक उत्तरप्रदेशला रवाना केले आहे.

Web Title: stage dance kidnapping crime