प्रवाशांना मिठाई भरवत तासाला मेट्रो सेवा सुरू

छत्रपती चौक ः अप-डाऊन मार्गावर क्रॉस होताना मेट्रो रेल्वे.
छत्रपती चौक ः अप-डाऊन मार्गावर क्रॉस होताना मेट्रो रेल्वे.

नागपूर : दर तासाला मेट्रो प्रवासी सेवेचा तसेच अप लाइनवर मेट्रो सेवेला आजपासून सुरुवात झाली. सीताबर्डी ते खापरी तसेच खापरी ते सीताबर्डी, अशी अप-डाऊन पहिली फेरी सकाळी आठ वाजता सुरू झाली. यावेळी खापरी व सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर मिठाई व फुले देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या दोन्ही मेट्रो एकमेकांना क्रॉस झाल्या, त्यावेळी प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रवाशांना आज सकाळी मेट्रो सेवा व महा कार्डसंदर्भात माहिती प्रदान करण्यात आली. याशिवाय मेट्रो स्टेशन येथे कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्यालादेखील मिठाईसह शुभेच्छा देण्यात आल्या. सीताबर्डी व खापरी येथून एकाच वेळी निघालेल्या दोन्ही मेट्रो रेल्वे छत्रपती चौक येथे क्रॉस झाल्या. यावेळी महामेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथन, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ओ अँड एम) सुधाकर उराडे, कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेक्कर, महाव्यवस्थापक (ट्रॅक) गुरबानी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मेट्रोतील प्रवासी सुभाष कौशीकर यांनी मेट्रोचे कौतुकच नव्हे तर अभिमान वाटत असल्याचे सांगितले. नागपूर मेट्रोने आज प्रवास करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. नागपूरचे सौंदर्य वरून बघण्याची आज संधी आम्हाला मिळाली याचे समाधान असल्याचे ते म्हणाले. लक्ष्मीचंद मेंढे या तरुणाने तरुण पिढीने जास्तीत-जास्त मेट्रोचा प्रवास करायला पाहिजे. मेट्रो प्रवास सुरक्षित असून एक सुखद अनुभव आल्याचे तो म्हणाला. मेट्रोने प्रवास करताना अतिशय आनंद होत आहे, हा प्रकल्प तयार होताना बघितले. आज प्रत्यक्षात प्रवास करण्याची संधी मिळाली. मेट्रो प्रकल्प इतर मेट्रोपेक्षा उत्तम असून नागपूरकरांना खूप लवकर मेट्रो सेवा मिळाली, असे एका महिलेने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com