राज्य नाट्य स्पर्धा 18 नोव्हेंबर ते एक जानेवारीदरम्यान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

नागपूर  : शासनाच्या दोन विभागातील वादावर पडदा पडल्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अखेर महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा 18 नोव्हेंबर ते 1 जानेवारीदरम्यान आयोजित केली आहे. सायंकाळी 7 वाजता (रविवार वगळता) आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात एकूण 25 नाट्यसंस्थांचे 25 प्रयोग होतील. राज्यातील 19 आणि दिल्ली, गोव्यासह एकूण 21 शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे 59 वे वर्ष आहे. 

स्पर्धेत 18 नोव्हेंबरला "मानसीचा शिल्पकार तो', 19 "गोलमाल', 20 "बायोपिक श्री', 21 "इठ्ठल इठ्ठल, लव्ह लव्ह', 24 (दुपारी 12.30वा) "वाटा पळवाटा', 25 "पहिलं प्रेम आणि प्रपोज', 26 "किश्‍त बहार', 29 "नेकी', 1 डिसेंबर (दुपारी 12.30 वा) "वारुळ', 2 डिसेंबर "एटीएस', 3 "न्यायप्रिय', 4 "सत्तांतर' आदी नाटकं सादर होतील. 
तसेच 5 डिसेंबर "ती फोन आणि मृत्यू', 6 "झलकारी', 8 (दुपारी 12.30 वा) "अप-डाउन', 9 "द फिअर फॅक्‍टर', 15 (दुपारी 12.30 वा) "विधिलिखित', 16 "सारी रात्र', 18 "निलांबरी', 19 "रामजत्रा', 23 "हिटलर बुट पॉलिश करतो आहे', 25 (दुपारी 12.30 वा) "ते बारा तास', 30 रोजी "ठिय्या', 31 डिसेंबरला "अर्थोही कन्या परकीय एवं', 1 जानेवारी रोजी "भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदन्त अश्‍वघोष' आदी नाटकं सादर होतील. 
काय होता वाद? 
सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून स्पर्धेच्या दृष्टीने सोईस्कर पु. ल. देशपांडे सभागृहासह सायंटिफिक सभागृहाचा विचार करण्यात येत होता. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 25 संघांचा विचार करता सलग 25 दिवस रंगमंच उपलब्ध होणे गरजेचे होते. तशी उपलब्धी दोन्ही सभागृहात नव्हती. शिवाय, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारे पु. ल. देशपांडे सभागृह अनामत रक्कम दिल्याशिवाय स्पर्धेसाठी (शासनाच्याच) उपलब्ध होऊ शकत नव्हते. अशातच या ठिकाणी 6 डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे, सायंटिफिक सभागृह अंतिम क्षणी निश्‍चित करण्यात आले. या वादात स्पर्धेत सहभागी संघांची गैरसोय झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State drama competitions from November 18 to January 1