"राज्य उत्पादन शुल्क'ची तीन दुकानांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गत पंधरवड्यात अवैध मद्यविक्रीबाबत विविध ठिकाणी मोहीम राबवत सुमारे 7 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच एका बिअर शॉपीसह 2 देशीदारू दुकानांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे.

निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक सज्ज असून विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. त्यात नुकत्याच केलेल्या कारवायांत विभागाने तीन वाहनांसह 1709 लिटर हातभट्टी दारू, 309 लिटर देशी दारू, 13,330 मोह रसायन, 36 लिटर विदेशी दारू, 18 लिटर सीमेबाहेरून आलेली दारू व साहित्य जप्त केले आहे.
निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यावर त्याबाबत जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक राजेश कावळे यांनी मद्य विक्री आस्थापना धारकांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांची संपूर्ण माहिती दिली. आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. काहीही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कावळे यांनी दिला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "State excise duty action" on three shops