अमरावती : श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटना, अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटना तथा डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हव्याप्र मंडळातील अनंत क्रीडा मंदिराच्या सुसज्ज जिम्नॅस्टिक हॉलमध्ये तीनदिवसीय 26 व्या राज्यस्तरीय ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील विभिन्न जिल्ह्यांतील 15 पंच अधिकारी आणि 25 संघ व्यवस्थापक प्रशिक्षक, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीयस्तरावर नैपूण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. अमरावती, नागपूर, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई शहर, औरंगाबाद, साई, वाशीम, हिंगोली, परभणी, मुंबई उपनगर या 12 जिल्ह्यांतील 114 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले आहेत. खेळाडूंनी विजयी होण्याची सामूहिक शपथ अमरावती राष्ट्रीय खेळाडू श्रुती पांडे हिने दिली.
महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे राज्य सचिव डॉ. मकरंद जोशी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. रवींद्र खांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीकांत चेंडके, माधुरी चेंडके, प्रा. डॉ. अजयपाल उपाध्ये, मधुकरराव कांबे, राज्य प्रशिक्षक संजय गाढवे, स्पर्धाप्रमुख संजय मोरे, प्रा. सागर कुळकर्णी व प्रा. डॉ. कविता वाटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. माधुरी चेंडके यांनी केले. संचालन अनंत निंबोळे, तर आभार आशीष हाटेकर यांनी मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.