आरोग्य प्रबोधिनीला राज्यस्तरीय युवा पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

गडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य, युवक कल्याण, व्यसनमुक्‍ती व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आरोग्य प्रबोधिनीला 2015-16 या वर्षासाठीचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 

गडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य, युवक कल्याण, व्यसनमुक्‍ती व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आरोग्य प्रबोधिनीला 2015-16 या वर्षासाठीचा महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय युवा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 

मुंबईतील दीक्षान्त सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आरोग्य प्रबोधिनीचे डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी प्रधान सचिव नंदकुमार, क्रीडा व युवक सेवा आयुक्‍त आर. आर. माने यांची प्रमुख उपस्थिती होती. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये व्यसनांबद्दल जाणीवजागृती, आरोग्य शिक्षण, वयात येतानाचे जीवन शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे, मुलगी वाचवा अभियान, दरवर्षी युवक कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य करणे, वैदू परंपरेतील नवयुवकांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रबोधन करणे, ग्रामीण युवकांचे संघटन करून योजनांची माहिती देणे, व्यायामशाळेच्या माध्यमातून योग व व्यायामाचे महत्त्व पटविणे आणि खेळांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रमांबद्दल संस्थेला युवक व क्रीडा संचालनालयाद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वीचा 2014-15 चा गडचिरोली जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा प्रशासनाद्वारे संस्थेला प्राप्त झाला आहे. संस्थेच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. गभने यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. 

Web Title: state level youth prize