राज्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आक्षेपार्ह भानगड?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

नागपूर - आमदार निवासात अल्पवयीन मुलीला डांबून सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच राज्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नागभवनातही आक्षेपार्ह भानगड सुरू असल्याची चर्चा मंगळवारी सायंकाळी पसरत गेली. 

पोलिसांनी नागभवनमधून तरुणाला ताब्यातही घेतले. अधिकाऱ्यांनी मात्र प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे म्हटले आहे. नागभवनमधील कॉटेज क्र. १० मध्ये शासकीय कार्यालयातील कर्मचारी, नागभवन कर्मचारी  आणि दोन तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत असल्याची चर्चा वाऱ्याच्या वेगाने पसरत गेली.

घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेले सीताबर्डीचे पोलिस नागभवनमध्ये धडकले. परिसरातून तरुणाला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. चौकशी सुरू असतानाच नागभवनचे अधिकारी ठाण्यात दाखल झाले. कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा त्यांनी नकार दिला. अधिकाऱ्यांनी  गैरसमजातून ही घटना घडल्याची लिखित हमी दिल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला.

Web Title: State Minister's resignation at the official residence of confussion?