विदर्भातील 28 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

जि. यवतमाळ : शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी 2017-18 मध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी विभाग, कला व क्रीडा, स्काउट व गाइड, दिव्यांग शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिकांमधून 107 शिक्षकांची राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात विदर्भातील 28 शिक्षकांचा तर यवतमाळ जिल्ह्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे.

राज्य शिक्षक पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्ह्यातून विजय विश्वकर्मा व अविनाश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मनसळ (ता. पुसद, जि. यवतमाळ) येथे कार्यरत विजय दुधनाथ विश्वकर्मा यांची निवड झाली आहे. त्यांनी डोंगराळ भागातील 100 टक्के आदिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.
माध्यमिक विभागातून स्व. माणिकराव पांडे विद्यालय फाळेगाव (ता. बाभूळगाव, जि.यवतमाळ) येथील शिक्षक अविनाश बाबाराव रोकडे यांची निवड झाली आहे. राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव शिक्षकदिनी, 5 सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते वाई (जि. सातारा) येथे करण्यात येणार आहे.

Web Title: state teacher award news