धरणांसाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

अकोला - जिल्ह्यातील नेरधामणा पूर्णा बॅरेजच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे सिंचनापासून शेतकरी वंचित राहत आहेl. शिवाय नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी जलसिंचन संघर्ष समिती अकोलाद्वारे जिल्हाअधिकारी कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात समितीचे  अध्यक्ष महादेवराव भुईभार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, भाई प्रदिप बाप्पु देशमुख यांच्या नेतृत्तावात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, प्रशांत अढाऊ, संजय भांबेरे, राहुल कराळे आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Static movement in Akola for dam