आता पुण्यासाठीही एसटीची स्लिपर सेवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नाशिक पाठोपाठ पुण्यासाठीही शिवशाही वातानुकूलित स्लीपर बससेवा सुरू केली आहे. मंगळवारी नागपूर-पुणे-नागपूर सेवेचा शुभारंभ झाला असून, उन्हाळ्यात  आरामदायी प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांची लालपरीच पहिली पसंती राहिली आहे. परंतु, खासगी  वाहतूकदारांनी एसटीला आव्हान दिले आहे. स्पर्धेला तोंड देतानाच प्रवाशांना आरामदायी सुखकर सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सतत प्रयत्नशील आहे. यातच एक पाऊल पुढे टाकत विदर्भात शिवशाही वातानुकूलित स्लीपर बस सेवा सुरू केली आहे. ५ मे रोजी नागपूर-नाशिक-नागपूर सेवेचा प्रारंभ झाला. त्यापाठोपाठ मंगळवारी पुण्यासाठी पहिली स्लिपरकोच धावली.

नागपूर-पुणे शिवशाही स्लिपर बस दररोज सायंकाळी ५ वाजता गणेशपेठ स्थानकावरून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पुणे स्थानक गाठेल. त्याचप्रमाणे पुण्यावरूनही दररोज सायंकाळी ५ वाजता बस रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता नागपूर स्थानक गाठेल. नागपूर, अकोला, जालना, औरंगाबाद, पुणे असा बसचा मार्ग आहे.

प्रवाशांना शिवशाही व इतर प्रवासी बसेससोबतच शिवशाही वातानुकूलित स्लीपर बसचे आरक्षण www.msrtc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन करता येणार आहे. शिवशाही वातानुकूलित स्लीपर बसमध्ये आकषर्क डिजिटल बोर्ड, मोबाईल चाजर्रसह,  सीसीटीव्ही व अनाऊन्समेंट सिस्टीम उपलब्ध आहे.

Web Title: STbus slipper service for nagpur to Pune