महिलांच्या हाती येणार एसटीबसचे स्टिअरिंग

रूपेश खैरी
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

वर्धा : राज्य परिवहन महामंडळात महिला वाहक कार्यरत असल्याचे सर्वश्रुत आहे. यात आता आणखी भर पडणार आहे. राज्य परिवहन महामंडळात येत्या काही दिवसात महिला चालक दिसणार आहेत. यातून वर्धा आगारात दहा महिला चालकांची निवड करण्यात आली आहे. या महिलांचे राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतूक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी वर्षभराचा आहे. या प्रशिक्षणानंतर एसटीबसचे स्टिअरिंग व्हील या महिला हाती घेणार आहेत.

महिला सक्षमीकरणाकरिता शासनाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. यात स्वयंरोजगारासह त्यांच्या उत्थानासाठी विविध योजनांसह शासकीय सेवेतही त्यांना प्राधान्य देण्यात येत आहे. शासनाच्या याच उपक्रमाला राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बऱ्यापैकी हातभार लावण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाचे महिला सक्षमीकरणाचे पहिले पाऊल म्हणजे नियुक्‍त करण्यात आलेल्या महिला वाहक आहेत. यानंतर महिला मेकॅनिकची नियुक्‍ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्‍तीने राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांवर महिला वाहक दिसून आल्या आहेत. यात आता आणखी भर पडणार असून येत्या काही दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या महिला चालकांच्या हाती दिसणार आहेत.
वर्ध्यात सध्याच्या सत्रात दहा महिला चालकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला प्रारंभ झाला आहे. वाहतूक प्रशिक्षण केंद्रात सुरू असलेल्या या प्रशिक्षणास सध्या आठ दिवसांचा कालावधी झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: STBUS steering for women