ढेप, सरकी, हिरवाचारा बजेट पलीकडे

file photo
file photo

वेलतूर (जि.नागपूर)  : सततच्या पावसामुळे दुधाळू जनावरांचा हिरवा चारा व ढेप, सरकीसारखा सकस आहार महागल्याने दूध उत्पादक हवालदिल झाला आहे. परिणामी दूध उत्पादनात घट झाल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे.
दूध उत्पादक शेतकरी वर्गाचे घटलेल्या दूध उत्पादनामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अनेकांनी कर्जाऊ रकमेतून शेतीपूरक रोजगार म्हणून जनावरे घेतली असल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे. गेल्या पंधरा दिवसींत ढेप व सरकीचा दर किलोमागे आठ ते दहा रुपये तर क्विंटल मागे सरसकट हजार रुपये वाढ झाली आहे. दुधाळ गायीला व म्हशीला देण्यात येणारे हे खाद्य दुधाळ जनावरांना संजीवनी असते तेच महागाईच्या विळख्यात सापडल्यामुळे पशुपालक शेतकरी बेचैन झाला आहे.
दुधाळू जनावरांचा सकस आहार नियमित असल्यास दूध उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा होतो. जनावरांना प्रथिनेयुक्त खाद्य मिळत राहिल्यास त्यांचे आरोग्यासाठी ते पूरक ठरून जनावरे सुदृढ असतात. मात्र, आता खाद्यानाचे भाव वाढल्याने दूध उत्पादक चांगलाच अडचणीत आला आहे. सहा महिने पूर्वी ढेप, सरकी, चुरी, कोडं, कुकुस बाजारात क्विंटला 2 हजार 500 रुपये होते. आता ते 3 हजार 400 ते 4 हजार रुपयेवर पोहोचले आहे.
हिरव्या चारा सततच्या पावसामुळे खराब झाला असून अनेक रोगांचे मूळ ठरू पाहत आहे. साठवलेल्या कडबा, कुटार, तणससारख्या वैरणीचेही भाव वाढल्याने व मिळत नसल्याने पशुपालक शेतकरी बेजार आहे.

सततच्या पावसामुळे अनेक टन वैरण भिजून खराब झाली आहे. त्यावर अनेक बुरशीजन्य रोगाचे जिवाणू वाढून ते अपायकारक ठरत आहेत. ते तसेच जनावरांना खाऊ घातल्यास जनावरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.गावागावांत चाराकोठार बांधून "चारा बॅंक' अस्तित्वात यावी तसेच चारा सबसिडीवर मिळावा.
- रंजीत कुकसे, अंभोरा फाउंडेशन


दुधाळ जनावरांना पोषण आहार सवलतीच्या दरात मिळावा व दुधाची दरवाढ व्हावी.
- निखिल खोब्रागडे, दूध उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com