सावत्र बापाचा मुलीवर अत्याचार

file photo
file photo


नात्याला फासला काळिमा; यशोधरानगरातील घटना

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. 10 ः सावत्र बापाने 14 वर्षांच्या मुलीवर गेल्या तीन महिन्यांपासून अत्याचार
केल्याची धक्कादायक घटना यशोधरानगर पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम बापास पोलिसांनी अटक केली. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याच्या घटनमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम सावत्र वडील हा दुचाकी दुरुस्तीचे काम करतो. त्याचे पहिले लग्न झाले असून पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्यावर्षी त्याचे एका घटस्फोटित महिलेशी प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला एक मुलगा व मुलगी आहे. तिच्याशीही त्याने विवाह करून तिलाही पहिल्या पत्नीसोबत एकाच घरी ठेवले. तिची मुलेही सोबत राहायची. पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकत आहे. दरम्यान, आई मजुरीवर गेल्यानंतर आरोपी पीडितेला दुपारच्या सुमारास एकट्यात गाठायचा व अश्‍लील चाळे करायचा. तिने कुणाकडे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. 22 मे 2019 ला घरात कुणीच नसताना आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. जिवे मारण्याची धमकी दिल्याने ती भेदरलेली होती. तेव्हापासून आरोपी सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. ती नेहमीच घाबरलेली राहत असल्याने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने तिची काळजीने विचारपूस केली. त्यावेळी तिने सर्व हकिगत सांगितली. शेजारच्या महिलेने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी अत्याचार
व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com