न्यायालयातून वकिलाची कार चोरली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

नागपूर : जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून एका वरिष्ठ वकिलाची महागडी कार चोरट्यांनी चोरी केली. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली. कार चोरी होताच वकिलाने सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत कार चोरणाऱ्या युवकाला काटोल परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून कारही जप्त केली. सूरज गोंडाणे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. मुकेश शुक्‍ला हे नेहमीप्रमाणे आज बुधवारी दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास जिल्हा न्यायालयात कारने पोहोचले. त्यांनी नेहमीप्रमाणे शेजारी असलेल्या एका पानठेलाचालकाकडे कारची किल्ली दिली. त्यानंतर ते न्यायालयात निघून गेले. दुपारी ते काही कामानिमित्त बाहेर आले असता त्यांना कार आढळून आली नाही. त्यांनी इकडे तिकडे विचारणा केली असता एका युवकाने कार नेल्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच सीताबर्डी पोलिस ठाण्यात कार चोरीची तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंह राजपूत यांनी वायरलेसवरून कारचा क्रमांक आणि आरोपीचे वर्णन सर्वच पोलिस स्टेशनला पाठविले. चार ते पाच तासानंतर आरोपी सूरज गोंडाणे याला काटोल परिसरातून सीताबर्डीच्या पथकाने पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोशल मीडियामुळे आरोपी ताब्यात
कार चोरी होताच सोशल मीडियावर कार चोरीचा व्हिडिओ आणि चोरट्याचा फोटो व्हायरल झाला. हा फोटो एवढा व्हायरल झाला की आरोपीच्या मित्राच्या मोबाईलवर गेला. मित्राने सूरजला फोन करून त्याची माहिती दिली. त्यामुळे सूरज हा कार सोडून पळून गेला. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stole a lawyer's lawyer from the court