फलाटाकडे जात असताना अचानक दगडफेक

फलाटाकडे जात असताना अचानक दगडफेक

नागपूर, : फलाटाकडे जात असताना अचानक दगडफेक होऊन दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. धावत्या रेल्वेवर दगडफेकीमुळे प्रवासी जखमी झाल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. पण, शनिवारच्या घटनेने नागपूर रेल्वेस्थानकावर उभे प्रवासीसुद्धा असुरक्षित असल्याचे अधोरेखित केले आहे. 
अशोक तभाने (41) रा. काटोल असे जखमी प्रवाशाचे नाव असून दुसऱ्याचे नाव कळू शकले नाही. तभाने काटोल पंचायत समिती कार्यालयाचे कर्मचारी आहेत. डाक पोहोचविण्यासाठी ते नागपूर जिल्हा परिषद कार्यालयात आले होते. काम आटोपल्यानंतर गावी परतण्यासाठी ते नागपूर रेल्वेस्थानकावर आले. नागपूर - आमला पॅसेंजरने ते जाणार होते. त्यासाठी तिकीट घेतले आणि फलाट क्रमांक 7 कडे जात असताना अज्ञात व्यक्तीने दगडफेक सुरू केली. एक दगड डोक्‍याला लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांचे शर्ट रक्ताने माखले. स्वत:ला सावरत असतानाच अन्य एका प्रवाशालाही दगड लागनू तोसुद्धा जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेतच तभाने यांनी लोहमार्ग ठाणे गाठले. झाल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने घटनेची दखल घेत दगडफेक करणाऱ्याचा शोध सुरू केला. त्याच वेळी अन्य कर्मचारी तभाने यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात घेऊन गेले. अलिकडेच नागपूर स्थानकावरून रवाना झालेल्या रेल्वेगाडीवर झालेल्या दगडफेकित प्रवासी जखमी झाला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com