सरकारी जनरल नर्सिंग स्कूलच्या प्रवेशाला थांबा 

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नागपूर - साहेब...यवतमाळवरून आलोय. नर्सिंग प्रवेश घ्यायचा आहे. तीन महिन्यांपासून मेयोत खेटा घालतो. परंतु, प्रवेश अर्ज मिळत नाही. खासगीत मुलीच्या प्रवेशासाठी 20 हजार रुपये मोजावे लागतात. गरिबायच्या मुलींना सरकारी नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश मिळत नाही काय? ही संतापजनक व्यथा एका पालकाची नसून विदर्भातील शेकडो पालकांची आहे. हीच स्थिती राज्यातील राज्यात 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आहे. येथे असलेल्या जनरल नर्सिंग स्कूलचे सत्र 1 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे इंडियन नर्सिंग कौन्सिलचे निर्देश आहेत.

नागपूर - साहेब...यवतमाळवरून आलोय. नर्सिंग प्रवेश घ्यायचा आहे. तीन महिन्यांपासून मेयोत खेटा घालतो. परंतु, प्रवेश अर्ज मिळत नाही. खासगीत मुलीच्या प्रवेशासाठी 20 हजार रुपये मोजावे लागतात. गरिबायच्या मुलींना सरकारी नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश मिळत नाही काय? ही संतापजनक व्यथा एका पालकाची नसून विदर्भातील शेकडो पालकांची आहे. हीच स्थिती राज्यातील राज्यात 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये आहे. येथे असलेल्या जनरल नर्सिंग स्कूलचे सत्र 1 ऑक्‍टोबरपासून सुरू करण्याचे इंडियन नर्सिंग कौन्सिलचे निर्देश आहेत. परंतु, वैद्यकीय संचालक कार्यालयाने अद्याप प्रवेशप्रक्रियाच सुरू केली नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. नर्सिंग स्कूल सुरू होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना प्रवेशालाच थांबा लागला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग स्कूलमध्ये प्रवेशाचा घोळ दरवर्षीच असतो. 
खासगी नर्सिंग स्कूलचे प्रवेश आधी हाउसफुल्ल व्हावे हाच हेतू असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. 

राज्यात मुंबईत सेन्ट जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय, नागपुरात इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अंबेजोगाई, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मिरज, कोल्हापूर, लातूर, धुळे येथे शासनाची जनरल नर्सिंग स्कूल सुरू आहेत. तीन वर्षीय अभ्यासक्रमात सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये 1400 प्रशिक्षणार्थी परिचर्या प्रशिक्षण घेतात. सध्या राज्यात 12 सरकारी (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) तर 450 खासगी जनरल नर्सिंग स्कूल आहेत. खासगी परिचारिका प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे जणू राज्यात पीक आले आहे. खासगीतील नर्सिंग स्कूलचे प्रवेश सुरू झाले. परंतु, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जीएनएम प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली नाही. आवेदन पत्रही मेयोत पोहोचले नाही. विशेष असे की, आगामी काळात देशात 137 जीएनएम स्कूल खासगीसाठी सुरू करण्याचा निर्णय यावर्षी केंद्र शासनाने घेतला आहे. वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा मोबाईल खणखणत होता. 

प्राचार्य, उपप्राचार्यशिवाय जीएनएम 
एक ऑक्‍टोबरला जनरल नर्सिंग सुरू करण्याच्या भारतीय परिचर्या परिषदेच्या निर्देशाला वैद्यकीय शिक्षण विभागाने "खो' दिला आहे. याशिवाय 40 वर्षांपासून जनरल नर्सिंगमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पाठ्यनिदेशिका, लघुलेखक, ग्रंथपाल, लिपिक, वाहनचालक, क्‍लीनर, गृहपाल, स्वयंपाकी, शिपाई पदनिर्मिती केली नाही. केवळ पाठ्यनिदेशक अर्थात ट्यूटरच्या भरवशावर जनरल नर्सिंग अभ्यासक्रम सुरू ठेवत शासनाकडूनच नियमाला हरताळ फासला आहे.

Web Title: Stop access to the state General Nursing School